ऑफिसच्या बाथरूममध्ये भेटल्यावर या टॉपिकवर मारतात गप्पा

ऑफिसच्या बाथरूमलाच बऱ्याचदा गॉसिप रुम बनवल जात.

Updated: May 12, 2018, 08:20 AM IST
ऑफिसच्या बाथरूममध्ये भेटल्यावर या टॉपिकवर मारतात गप्पा

मुंबई : ऑफिसमध्ये काम करताना मुलींना गप्पा मारण्याची संधी फार कमी मिळते. अशावेळी ऑफिसच्या बाथरूमलाच बऱ्याचदा गॉसिप रुम बनवल जात. बराच वेळ शांत आणि गप्प राहिल्यानंतर मुलींच्या डोक्यात अनेक विचार येऊ लागतात. त्यांना लवकरात लवकर त्या गोष्टी कोणासोबत तरी शेयर करायच्या असतात. अशावेळी बाथरुमची मदत घेतात आणि खासगी गोष्टी शेयर करतात. पण या गप्पा काय असतात याबद्दल अनेकांना उत्सुकता असतेच. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या अनेक मुली जास्त करुन रिलेशनशीप किंवा प्रेमात असतात. अशावेळी आपल्या मित्राला प्रत्येक दिवसाची अपडेट देत असतात. 

गॉसिप 

ऑफिसच्या स्टाफमध्ये कोणाच प्रेम बहरत असेल तर त्यावरही गॉसिप सुरू होत. आपल्या क्रशच लग्न तर झाल नाहीए ना हे जाणून घेणं काहींसाठी अनेकदा महत्त्वाच ठरत. एकमेकींच्या फॅशन, ड्रेसिंग सेन्सवर बोलण अनेकींना आवडत. ऑफिस पॉलिटीक्स हा अनेकांचा आवडीचा विषय. चांगला असो वा वाईट. आपल्या बॉसबद्दल अनेकदा कमेंट केली जाते. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close