Virginity म्हणेज काय? व्हर्जिनिटी बाबत प्रत्येक प्रश्नांची उत्तर

आज आम्ही तुम्हाला व्हर्जिनिटी बाबत प्रत्येक प्रश्नांची उत्तरं या लेखातून देणार आहेत.

Updated: Oct 10, 2022, 09:20 PM IST
Virginity म्हणेज काय? व्हर्जिनिटी बाबत प्रत्येक प्रश्नांची उत्तर title=
What does virginity mean Answers to every question about virginity nz

Gayatri Pisekar Zee Media : वयात आल्यावर अनेक तरूण तरूणी Virginity हा शब्द नवीनच ऐकतात. मात्र व्हर्जिनिटी (Virginity) म्हणजे काय याबाबत त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. पुरेशी माहिती उपलब्ध नसल्यामुळे किंवा कोणाला विचारायचीही सोय नसल्यामुळे अनेक शकांचा जन्म होतो. अनेकदा या विषयावर पालक देखील बोलत नाहीत. हा विषय चारचौघात नेहमीच टाळला जातो या विषयावर खूलं भाष्य करायला कोणी तयार नसतं म्हणूनच आज आम्ही तुम्हाला व्हर्जिनिटी बाबत प्रत्येक प्रश्नांची उत्तरं या लेखातून देणार आहेत. (What does virginity mean Answers to every question about virginity nz)

सर्वप्रथम व्हर्जिनिटीविषयी जाणून घेण्याआधी हायमन (hymen) म्हणजे हे जाणून घेऊया-

व्हर्जिनिटीचा संबंध हायमनशी जोडला जातो. योनीमार्गाच्या प्रवेशद्वाराशी एक पातळ पडदा असतो ज्यास हायमन असं म्हणतात. जो रक्तवाहिन्या, मसल फायबर (muscle fibers) संयोजी ऊतक (connective tissue) या सगळ्यांपासून बनलेला असतो. 

आणखी वाचा - मासिक पाळी लांबवण्यासाठी गोळ्या खाण्याऐवजी 'हे' घरगुती उपाय करुन पहा...

 

हायमन (hymen) आपण पाहू शकतो का?

हायमन योनिमार्गाच्या 0.8 इंच (1-2 सेंटीमीटर) आत असते. जे बाह्य आणि अंतर्गत जननेंद्रियाच्या अवयवांमध्ये आंशिक सीमा तयार करते. हायमन अबाधित असल्यास ते डिटेक्ट करता येऊ शकतं. शरीराच्या आकाराप्रमाणे हायमेनचे स्वरूप आणि रचना बदलते. प्रत्येक हायमनचा स्वतःचा आकार असतो. हायमनचा आकार हा त्याची जाडी, लवचिकता, रक्तवाहिन्या त्यामध्ये असलेले मसल फायबर (muscle fibers) यावर अवलंबून असतो. 
काही हायमन लवचिक stretchable असू शकतात. 

साधारणत: गर्भपिशवीमध्ये कोणत्याही प्रकारच्या Infection चा शिरकाव होऊ नये यासाठी हायमन महत्त्वाची भूमिका बजावतं. हायमनचा नेमका वापर काय याबाबतआतापर्यंत, शास्त्रज्ञ एकमताने निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाहीत. 0.03 महिलांमध्ये जन्मत:च हायमन नसू शकतं. मात्र, तरीही त्यांच्या प्रजनन संस्थेच्या वाढीवर कोणताही परिणाम होत नाही. कारण निरोगी लैंगिक वाढीसाठी हायमनची आवश्यक नसते. 

हायमनमधून मासिक रक्तस्त्राव कसा होतो?

नैसर्गिकरित्या रक्तस्त्राव होण्यासाठी हायमनला एक किंवा अनेक छिद्र असतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हायमनचा आकारा एखाद्या छोट्या डोनटसारखा असतो. ज्याला मध्ये एक मोठं छिद्र असतं. काहींच्या हायमनला दोन छिद्र (septate type) असू शकतात ज्यामुळे ते नाकपुडी सारखं दिसतं. 

अनेक लहान छिद्र (microperforate type) ही असू शकतात. किंवा एकही छिद्र (imperforate type) नसू शकतं.काही वेळा हायमनचे छिद्र इतकं छोटं असू शकतं की ज्यामुळे टॅम्पून वापरणं त्रासदायक होऊ शकतं.  अशावेळी गायनॅकोलॉजिस्टचा (gynaecologist) सल्ला घेणं योग्य ठरेल.

आणखी वाचा - How To Get Pregnant Fast: प्रेग्नेंसीचा प्लान करताय तर या गोष्टीची घ्यावी काळजी

 

जर हायमन फाटलं तर रक्तस्त्राव होतो का?

प्रत्येक हायमनची स्वतंत्र अशी रचना असते. काही व्यक्तींना रक्तस्त्राव किंवा वेदना जाणवू शकतात, तर काहींना नाही. हायमेनच्या जाडीवर हे अवलंबून असते. ते जितके जाड असेल तितकं ते अधिक वेदनादायी असू शकतं.

एका सर्वेक्षणानुसार, पहिल्या लैंगिक संबंधादरम्यान रक्तस्त्राव फक्त 43 टक्के प्रकरणांमध्ये होतो. काही थेंब रक्तस्त्राव ते काही दिवस रक्तस्त्राव होऊ शकतो. रक्तस्त्राव तीन दिवसांपेक्षा जास्त काळ राहिल्यास, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

अनेकदा सायकलिंग, स्विमींगसारख्या काही ॲक्टिव्हीटीमुळे हायमन फाटू शकतं. मात्र, याचा संबंध थेट चारित्र्याशी जोडला जातो. पहिल्या लैंगिक संबंधादरम्यान जर रक्तस्त्राव आला नाही तर त्या स्त्रीच्या चारित्र्यावर संशय देखील घेतला जातो. म्हणूनच व्हर्जिनिटीचा संबंध हायमनशी जोडला जातो. त्याविषयी ही माहिती जाणून घेणं गरजेचं आहे.