चीनचा खोडा, मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी करण्यास नकाराधिकार

अमेरिकेच्या प्रस्तावावर चीनने खोडा घातला आहे. त्यामुळे भारताला हवा असणारा पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात लगाम बसलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 2, 2017, 09:08 PM IST
चीनचा खोडा, मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी करण्यास नकाराधिकार title=

नवी दिल्ली : अमेरिकेच्या प्रस्तावावर चीनने खोडा घातला आहे. त्यामुळे भारताला हवा असणारा पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात लगाम बसलाय.

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने जोरदार हालचाली करत जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्यास प्रयत्न केले. या प्रयत्नांना चीनकडून पुन्हा एकदा खोडा घालण्यात आलाय. गेल्यावर्षीही चीनने संयुक्त राष्ट्रात चीनने 'नकाराधिकाराचा' वापर करत भारताच्या प्रयत्नांना खीळ घातली होती. 

दरम्यान, अमेरिका, फ्रान्स आणि इंग्लंड या देशांनी मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक्तपणे प्रस्ताव ठेवला होता. मात्र, या ठरावावर एकमत होऊ शकलेले नाही, असे वृत्त 'पीटीआय'ने दिलेय.

गतवर्षी मार्च महिन्यात १५ देशांचा समावेश असलेल्या संयुक्त राष्ट्राच्या समितीमध्ये हा ठराव मांडण्यात आला. तेव्हा १४ देशांनी भारताच्या प्रस्तावावर सहमती दर्शविली, मात्र, चीनला हा प्रस्ताव मान्य नव्हता. त्यामुळे मसूद अजहरची संपत्ती गोठवता आलेली नाही. तसेच मसूदच्या प्रवास करण्यावर बंदी घालण्यात यश आले असते. मात्र, चीनचा खोडा पुन्हा एकदा दिसून आलाय.

मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी सर्वानुमत नसल्याचे कारण पुढे करत चीन हा प्रस्ताव फेटाळून लावला. गेल्या अनेक दिवसांपासून तांत्रिक कारण पुढे करत चीनने हा प्रस्ताव अडवून ठेवला होता. ऑगस्ट महिन्यात चीनने या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी तीन महिन्यांची मुदत वाढवून घेतली होती. चीनकडून वारंवार मसूद अजहरच्या वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.