चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर, एका दिवसात एवढया लोकांना कोरोनाची लागण

पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाचा धोका वाढला 

Updated: May 25, 2020, 02:14 PM IST
चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर, एका दिवसात एवढया लोकांना कोरोनाची लागण  title=

बीजिंग : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वाढत आहे. चीनमध्ये एकाच दिवशी कोविड-१९ चे ५१ नवे रूग्ण आढळले आहेत. ज्यामधील ४० लोकांमध्ये कोरोना संक्रमणची लक्षण आढळत नाहीत. चीनमध्ये कोरोनाचे अनेक रूग्ण हे वुहानमधूनच आले आहेत. गेल्या १० दिवसांत वुहानमध्ये ६० लाखाहून अधिक लोकांच्या कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. 

देशाची राष्ट्रीय स्वास्थ आयोग (NHC) यांनी रविवारी सांगितलं की, चीनमध्ये कोरोनाशी संबंधित आलेले नवे रूग्ण हे लोकल ट्रान्समिशनशी जोडलेले नाही. मात्र ११ नवीन रूग्ण हे बाहेरचे आहेत. यामध्ये १० रूग्ण हे मंगोलिया आणि सिचुआन प्रांतातील आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना संक्रमणाची लक्षण न दिसणारे ४० नवे रूग्ण आढळले आहे. ज्यामधील ३८ रूग्ण हे वुहानचे आहेत. वुहानमध्ये कोरोनाची लक्षण न दिसता आकडा वाढत असल्यामुळे सरकारने चाचण्यांचे प्रमाण वाढवले आहे. 

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार संक्रमणाची लक्षण न आढळलेले ३९६ रूग्ण हे चीनच्या आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली आहे. ज्यामधील ३२६ रूग्ण हे वुहानमधील आहेत. काही रूग्णांमध्ये ताप, सर्दी, खोकला यासारखी लक्षण आढळत नाहीत. मात्र त्यांना कोरोनाची लागण झालेली असते. या रूग्णांमुळे इतरांना कोरोनाची लागण होऊ शकते. 

वुहान शहरात १४ मे ते २३ मेपर्यंत ६० लाख नागरिकांची चाचणी करण्यात आली आहे. चीनमध्ये रविवारपर्यंत ८२,९८५ लोक कोरोनाबाधित झाले असून ४,६३४ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.