किळसवाणे! शवागरात महिलेच्या डेड बॉडीसोबत सेक्स, 'असा' सापडला आरोपी

Man sex with Woman Dead Body: शवागरात आरोपीचा बेल्ट आणि पँट अस्ताव्यस्त पडलेली होती. त्याचा गणवेश अस्वच्छ दिसत होता. 

Pravin Dabholkar | Updated: Dec 1, 2023, 04:59 PM IST
किळसवाणे! शवागरात महिलेच्या डेड बॉडीसोबत सेक्स, 'असा' सापडला आरोपी title=

Man sex with Woman Dead Body: जगभरात एकाचवेळी अनेकप्रकारचे गुन्हे समोर येत असतात. काहीही कारणे असली तरी कोणताही गुन्हा हा वाईटच असतो. पण काही गुन्हे अत्यंत किळसवाणे असतात. असेच माणुसकीला लाजवणारे प्रकरण समोर आले आहे. रुग्णालयाच्या शवागरात असलेल्या महिलेल्या डेड बॉडीसोबत कामवासना पूर्ण करण्याचे दुष्कृत्य सुरक्षा रक्षकाने केले आहे. अमेरिकेतील अ‍ॅरिझोना येथील रुग्णालयात ही घटना घडली. येथील शवागाराच्या सुरक्षा रक्षकाने मृत महिलेसोबत सेक्स केला. फिनिक्समधील बॅनर युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरच्या शवागारात घडली. रँडल बर्ड असे सुरक्षा रक्षकाचे नाव असून तो 46 वर्षांचा आहे. गेल्या महिन्यात त्याने एका 79  वर्षीय महिलेच्या मृतदेहासोबत लैंगिक संबंध ठेवल्याचे निदर्शनास आले होते. ही घटना समोर येताच लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.  न्यूयॉर्क पोस्टमध्ये यासंदर्भात वृत्त देण्यात आले आहे. 

22 ऑक्टोबर रोजी या 79 वर्षीय महिलेचा मृतदेह शवागारात आणण्यात आला होता. मृतदेह शवागारात नेण्याचे आणि फ्रीझरमध्ये ठेवण्याची जबाबदारी रँडल बर्ड याच्याकडे होती.  22 ऑक्टोबर रोजी दोन साक्षीदारांनी आरोपी  रँडल बर्डला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. त्याचा बेल्ट आणि पँट अस्ताव्यस्त पडलेली होती. त्याचा गणवेश अस्वच्छ दिसत होता. अंगातून घाम वाहत होता आणि तो घाबरला होता, असे 2 साक्षीदारांनी पोलिसांना सांगितले.

'वृद्ध महिलेच्या बॉडी बॅगची चैन उघडी होती आणि आरोपी हा मृतदेहाच्या अगद जवळ होता. साक्षीदारांनी शवगृहात प्रवेश करताच, बर्डने ताबडतोब पीडितेचे शरीर झाकण्याचा प्रयत्न केला. मेडिकल एमर्जन्सीमुळे मी बेशुद्ध झालो आणि पीडितेचा मृतदेह जमिनीवर पडला आणि यादरम्यान बॉडी बॅग फुटून झिप फुटली, असे आरोपीने साक्षीदारांना सांगितले. 

आरोपीने रचलेल्या कहाणीवर कोणी विश्वास ठेवला नाही. त्यामुळे तक्रार केली होती. घटनेच्या 3 दिवसांनंतर पोलिसांनी पुन्हा एकदा आरोपीची चौकशी केली. यावेळी आधीच्या वक्तव्यावर ठाम राहिला. मात्र, त्यावेळी काय घडले ते आठवत नाही, असे त्याने सांगितले. वैद्यकीय अहवालात महिलेच्या अंगावर जखमा आढळल्या. काही पुरावे सापडल्यानंतर मंगळवारी सुरक्षा रक्षकाला ताब्यात घेण्यात आले. आरोपींविरुद्ध 5 फौजदारी गुन्ह्यांची नोंद करून दोषारोपपत्र सादर करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

नोकरीतून काढून टाकले

हे प्रकरण उघडकीस येताच रुग्णालय व्यवस्थापनाने आरोपी गार्डला नोकरीवरून बडतर्फ केले. 'बॅनर-युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर फिनिक्स येथे तैनात असलेल्या एका व्यक्तीच्या कथित कृत्यामुळे आम्हाला दुःख आणि धक्का बसला आहे, असे निवेदन हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी दिले. आमच्या टीमच्या प्रत्येक सदस्याने जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येकाशी दया, आदर आणि सन्मानाने वागणे आवश्यक आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठीही आम्ही व्यवस्था करू, असेही पुढे म्हटले गेले.