मोदींच्या दौऱ्याआधी पाकवर अमेरिकेचा ड्रोन हल्ला?

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर जाण्याआधीच पाकिस्तानंला जोरदार हादरा देण्याची ट्रम्प प्रशासनानं सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

Updated: Jun 20, 2017, 01:08 PM IST
मोदींच्या दौऱ्याआधी पाकवर अमेरिकेचा ड्रोन हल्ला? title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर जाण्याआधीच पाकिस्तानंला जोरदार हादरा देण्याची ट्रम्प प्रशासनानं सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

'झी मीडिया'च्या सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार, पाकिस्तानमध्ये असणाऱ्या दहशतावद्यांच्या तळांवर अमेरिकन सैन्याचे ड्रोन हल्ले करण्याच्या तयारीत आहे. 

याशिवाय पाकिस्तानला दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीचाही पुनर्विचार केला जाण्याची शक्यता आहे. दहशतवादाविरोधात सुरू असलेल्या लढाईचा एक भाग म्हणून पाकिस्तानी हद्दीत ड्रोन हल्ले नवे नाहीत. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानाच्या सीमा भागात दहशतवाद्यांचे अनेक तळ आहेत. हे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी अमेरिकन लष्करानं अनेकदा ड़्रोन विमानांचा वापर केलाय. 

अनेकदा ही कारवाई पाकिस्तानच्या हद्दीत जाऊनही केली जाते. गेल्या काही दिवसांत अफगाणिस्तानात दहशतवादी हल्ल्यांची संख्या वाढलीय. या पार्श्वभूमीवर अमेरिकन सैन्य आक्रमक झालंय. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या कारवाईला विशेष महत्व आहे.