पाकिस्तान विमान अपघातात वाचलेल्या व्यक्तीचा भारताशी संबंध

केवळ 2 प्रवासी या अपघातात बचावले...

Updated: May 24, 2020, 05:05 PM IST
पाकिस्तान विमान अपघातात वाचलेल्या व्यक्तीचा भारताशी संबंध title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या कराचीमध्ये शुक्रवारी विमानाला अपघात झाला. या विमानात 100 प्रवासी असून त्यापैकी 98 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. केवळ 2 प्रवासी या अपघातात बचावले आहेत. त्यापैकी एका वाचलेल्या व्यक्तीचा भारताशी संबंध आहे. बँक ऑफ पंजाबचे शीर्ष कार्यकारी अधिकारी जफर मसूददेखील याच विमानात होते, ते जखमी झाले आहेत. ते मूळचे उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील आहेत. त्यांचा 'पाकीजा' चित्रपटाचे दिग्दर्शक कमल अमरोही यांच्या कुटुंबाशी संबंध आहे.

कराची विमानतळाजवळ शुक्रवारी लॅन्डिंग होण्यापूर्वीच विमानाला अपघात झाला. त्यात अनेकांचा मृत्यू झाला. यात विमानात जफर मसूद प्रवास करत होते, जे या अपघातात वाचलेल्या दोघांपैकी एक आहेत.

जफर मसूद यांचे नातेवाईक असलेल्या आदिल जफर यांनी सांगितलं की, जफर मसूद यांचं कुटुंब 1952मध्ये पाकिस्तानात गेलं. मुंबईत डॉक्युमेट्री बनवणारे आदिल, जफर मसूद यांच्या आईचे चुलत भाऊ आहेत. 

तसंच 'पाकीजा' चित्रपटाचे दिग्दर्शक कमल अमरोही यांचेदेखील ते नातेवाईक आहेत.

पाकिस्तानात विमान कोसळलं; ९८ प्रवासी दगावल्याची भीती