इस्रायल आणि भारतामध्ये झाले हे करार

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली.

Updated: Jul 5, 2017, 11:04 PM IST
इस्रायल आणि भारतामध्ये झाले हे करार title=

जेरुसलेम : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. दोन्ही देशांदरम्यान अंतराळ संशोधन, शेती, जलव्यवस्थापन आदी विषयांमध्ये 7 वेगवेगळे करार करण्यात आले. तसंच औद्योगिक संशोधन आणि विकासासाठी 40 दशलक्ष डॉलर्सचा संयुक्त निधी उभारण्याचंही यावेळी निश्चित कऱण्यात आलंय.

या निधीमध्ये दोन्ही देश समान भागिदार असतील. दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी परस्परांना सहकार्य करण्याबाबत नेतन्याहू आणि मोदींमध्ये चर्चा झाली. दहशतवाद ही जागतिक समस्या आहे आणि भारत, इस्रायल हे दोन्ही देश दहशतवादाचे थेट शिकार होत आहेत. त्यामुळे परस्परांचं हित जपून दहशवाद आणि हा दहशतवाद पोसणाऱ्यांविरोधात एकत्र काम करण्याचं दोन्ही नेत्यांनी निश्चित केलंय.