Video: 'पायाखालची जमीन सरकरली' ही म्हण ऐकली असेल, आता प्रत्यक्ष बघा... नाचता नाचता 25 विद्यार्थी गाडले गेले

मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आणि विद्यार्थिनी एकत्र जमून नाचत होते, सर्वत्र आनंदाचं वातावरण होतं, पण त्याचवेळी अचानक जमीन खचली

Updated: Jan 16, 2023, 08:59 PM IST
Video: 'पायाखालची जमीन सरकरली' ही म्हण ऐकली असेल, आता प्रत्यक्ष बघा... नाचता नाचता 25 विद्यार्थी गाडले गेले title=

Viral Video : सोशल मीडियावर (Social Media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. यातले काही व्हिडिओ आपल्याला विचार करायला भाग पाडतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. आतापर्यंत आपण पायाखालची जमीन सरकली, अशी म्हण अनेकवेळा ऐकली असेल. पण प्रत्यक्षात अशी दुर्देवी घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अंगाचा थरकाप उडेल अशी ही घटना आहे. 

काय आहे व्हायरल व्हिडिओत?
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत काही विद्यार्थी-विद्यार्थिनी ग्रॅज्युएशनची पार्टी (Student Graduation Party) करताना दिसत आहेत. सर्व विद्यार्थी म्युझिकच्या तालावर डान्स करताना दिसत आहेत. वातावरण अगदी आनंदी दिसत आहेत, पण त्याचेवळी असं काही घडलं की डोळ्यावर विश्वास ठेवणं कठीण बनतं. विद्यार्थी नाचत असताना त्यांच्या पायाखालची जमीन अचानक खचते (Landslide) आणि नाचणारे सर्व विद्यार्थी त्या जमिनीत गाडले जातात. मिळालेल्या माहितीनुसार सुमारे 25 विद्यार्थी जमीन खचल्याने तयार झालेल्या खड्ड्यात पडले. 

घटना कुठे घडली?
व्हायरल होणारा हा व्हिडिओ पेरू (Peru) देशातल्या सॅन मार्टिन इथला असल्याचं बोललं जात आहे. या ठिकाणी विद्यार्थ्य्यांची ग्रॅज्युएशन पार्टी सुरु असताना ही दुर्देवी घटना घडली. हा व्हिडिओ pop_o_clock नावाच्या इन्स्ट्राग्राम (Instagram) अकाऊंटवर शेअर झाला आहे. हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने अशा ठिकाणी सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान, या घटनेत किती विद्यार्थी जखमी किंवा मृत्यू झाला याची माहिती मिळू शकलेली नाही. पण व्हायरल होणाऱ्या व्हिडिवर लोकांनी दु:ख व्यक्त केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by POP O’CLOCK (@pop_o_clock)

इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर झाल्यापासून आतापर्यंत 28 हजारहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिल आहे, अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.