अमेरिकन दूतावासावर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला

इराणचा प्रतिहल्ला

Updated: Jan 5, 2020, 07:45 AM IST
अमेरिकन दूतावासावर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला  title=

बगदाद : अमेरिकेने इराकची राजधानी बगदादमध्ये हवाई हल्ला चढवला तसेच इराणच्या लष्कराचे वरिष्ठ कमांडर जनरल कासीम सुलेमानी यांना ठार मारलं. यावर इराणने प्रतिहल्ला केला आहे. बगदादमधील अमेरिकन दूतावासावर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. 

एवढंच नव्हे तर जामकरण मशिदीवर लाल झेंडा फडकवण्यात आला आहे.  यावरून इराणने अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारल्याचे संकेत मिळत आहेत. अमेरिकेच्या ठिकाणांना लक्ष्य करणारा कुणीही असला तरीही त्याला हुडकून त्याचा खात्मा करण्यात येईल, अशी धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. 

इराण आणि अमेरिकेच्या या वादामुळे आखाती देशातही तणाव वाढला असल्याचे पाहायला मिळत आहे. इराकची राजधानी असलेल्या बगदादमधील ग्रीन झोनला शनिवारी इराणने लक्ष्य केलं आहे. अमेरिकी दूतावासाच्या आत क्षेपणास्त्र डागण्यात आल्याचं दिसत आहे. हल्ल्यात अद्याप जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र बगदादमध्ये अमेरिकेच्या विमानांच्या घिरट्या सुरू झाल्या आहेत. दरम्यान इराकच्या मध्यवर्थी भागातील बलाद हवाईतळावर देखील क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला आहे. (अमेरिकेचा बगदादवर दुसरा हवाई हल्ला, ६ जण ठार) 

अमेरिकेने  इराकची राजधानी बगदादमध्ये हवाई हल्ला चढवला असून यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री उशीरा अमेरिकेने बगदाद एअरपोर्टवर हल्ला चढवत इराणच्या लष्कराचे वरिष्ठ कमांडर जनरल कासीम सुलेमानी यांना ठार मारलं. अमेरिकेने हा हल्ला बगदादच्या महत्वाच्या शहरावर केला आहे. या हल्यामध्ये मारले गेलेले हे इराण समर्थक मिलिशिया हश्द अल-शाबी असल्याचे सांगितले जात आहे. हश्द अल-शाबी ईराण समर्थक हे प्रसिद्ध मोबलाइजेशन फोर्सेसचे दुसरे नाव आहे. 

इराणच्या लष्कराचे वरिष्ठ कमांडर जनरल (IRGC) कासीम सुलेमानी इराकची राजधानी बगदाद येथे मारले गेले. कासीम सुलेमानी यांचा ताफा बगदादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेने जात असताना अमेरिकेकडून हवाई हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आठजण ठार झाले.