मुंबई : मराठी अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रिया ही तिच्या बिनधास्त आणि हटके अभिनयासाठी ओळखली जाते. फक्त अभिनय नाही तर तिच्या सौंदर्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. प्रिया ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसतं. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतीच प्रियानं एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. 


आणखी वाचा : धर्मेंद्र यांच्या घरी Hema Malini आणि मुलींना नव्हती एन्ट्री पण..., ईशा देओलनं अशी मोडली परंपरा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियानं झी मराठीवरील 'बस बाई बस' (Bas Bai Bas) या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या शोची निर्मिती ही खास महिलामंडळीसाठी करण्यात आली. या शोमध्ये फक्त महिला सेलिब्रेटी सहभागी होत असतात. आता अभिनेत्री प्रियानं  शोमध्ये हजेरी लावली आहे. यामध्ये सुबोध भावे सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळत आहे. प्रियानं यावेळी अनेक धम्माल किस्से सांगितले. मालिका, चित्रपट याबरोबरच प्रियाने नाटकांतही काम केलं आहे. कार्यक्रमात सुबोध भावेनं (Subodh Bhave) प्रियाला तिच्या नाटकाबद्दल एक प्रश्न विचारला. यावेळी प्रियाने नाटकाचा प्रयोग सुरू असताना तिच्याबरोबर घडलेला एक मजेशीर किस्सा सांगितला. (priya bapat talk about her experience during theater) 


आणखी वाचा : हृतिक आणि सैफच्या यशात 'या' गोष्टीचा मोलाचा वाटा..., दोघांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ...


सुबोध भावेनं प्रियाला 'कलाकार कधी वाक्य विसरतात. कधी जास्तीची वाक्य घेतात, यामुळे बऱ्याचदा नाटक लांबतं. अडीच तासाचं नाटक कधीकधी तीन तासाचं होतं. पण या व्यतिरिक्तही काही कारणांमुळे नाटक लांबलेलं मी ऐकलं आहे. नेमंक काय घडलं होतं?', असा प्रश्न त्यानं विचारला.


आणखी वाचा : नोरा फतेही गार्डन डान्स करताना आली हवा अन्..., पाहा काय झालं


सुबोधनं विचारलेला प्रश्न ऐकताच प्रियाला तिच्याबरोबर घडलेला किस्सा आठवला. किस्सा शेअर करत ती म्हणाली, 'उमेश कामत, मी आणि हेमंत ढोमे ’नवा गडी नवं राज्य’ हे नाटक करायचो. पुण्यातील एका प्रयोगाला हा किस्सा घडला. नाटकात एका सीनमध्ये मी रंगमंचावरून बाहेर गेल्यावर हेमंत-उमेशचं संभाषण सुरू असतं आणि त्यांच्या काही वाक्यानंतर माझी पुन्हा एन्ट्री होते. प्रयोग सुरू असताना नाटकातील त्या सीनला मी विंगेत(रंगमंचाबाहेर) गेले आणि माझ्या लक्षात आलं की मला लघुशंका आली आहे. पुढे मला संपूर्ण नाटक करायचं होतं. त्यामुळे मी विंगेतून हेंमत आणि उमेशला खुणावून सांगितलं की तुम्ही संभाषण चालू ठेवा. मी पटकन जाऊन येते.'


आणखी वाचा : Private Photo लीक ते साखरपूडा तुटण्यापर्यंत, ही अभिनेत्री आहे तरी कोण


'हेंमत आणि उमेशनं मी येईपर्यंत संभाषण सुरू ठेवलं होतं. मी पटकन धावत गेले आणि आल्यानंतर त्यांना विंगेतून खुणावलं. मी आले आहे. आता तुम्ही शेवटचं वाक्य घ्या म्हणजे मला पुन्हा रंगमंचावर एन्ट्री घेता येईल', प्रियानं हा किस्सा सांगताच सुबोधलाही हसू आवरलं नाही. 


आणखी वाचा : दीपिका आणि रणवीर वेगळे होणार? अभिनेता म्हणाला...


तो पुढे म्हणाला, 'बरेचसे कलाकार असे असतात जे नाटकाची तिसरी घंटा व्हायच्या आधी बाथरूमजवळ सापडतात. नाटक सुरू व्हायच्या आधी त्यांना प्रेशर आलेलं असतं. पण यावरूनच कलाकारांची त्यांच्या कामावर, नाटकावर असलेली श्रद्धा दिसून येते.'