वैयक्तिक कारणामुळे चर्चेत असणाऱ्या सिद्धार्थ जाधवच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, जाणून बसेल धक्का
सिद्धार्थनं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुंबई : मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) हा त्याच्या लोकप्रिय अभिनेत्यांच्यांपैकी एक आहे. सिद्धार्थ हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. त्याचे अपकमिंग प्रोजेक्ट्स ते त्याच्या खासगी आयुष्या संबंधीत सगळ्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करतो. सिद्धार्थ याचे चाहते फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतात आहेत. बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर सिद्धार्थ आता लवकरच दाक्षिणात्य चित्रपटातील लोकप्रिय कलाकार विजय सेतूपतीसोबत (Vijay Sethupathi) दिसणार आहे. याची माहिती सिद्धार्थनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे.
आणखी वाचा : 'माझ्या एका हातात राधिका तर, दुसऱ्या...', सैफ अली खानचं वक्तव्य चर्चेत
सिद्धार्थनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा टीझर शेअर केला आहे. सिद्धार्थनं शेअर केलेल्या या टीझरमधून हा मुकपट असल्याचे कळत आहे. या चित्रपटाचं नाव 'गांधी टॉक्स' (Gandhi Talks) आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे की सिद्धार्थ हा विजय सेतूपती, अरविंद स्वामी (Arvind Swami), आदिती राव हैदरी या कलाकारांसोबत काम करणार आहे.
आणखी वाचा : 'मस्तराम' मधील अभिनेत्रीचा बोल्ड लूक पाहून चाहते हैराण, पाहा व्हिडीओ
आणखी वाचा : लग्नाआधी अली फजल- रिचा चड्ढाच्या कॉकटेल पार्टीचे फोटो समोर!
हा टीझर शेअर करत 'उत्सूक आहे, माझा पुढील सिनेमा. पुन्हा एकदा मुकपटांचा काळ जगूया. झी स्टुडिओज अभिमानाने सादर करत आहे 'गांधी टॉक्स'. विजय सेतूपती, अरविंद स्वामी, अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ जाधव स्टारर डार्क कॉमेडी आणि ए. आर. रहमान यांचे म्युझिकल.' (Siddharth Jadhav Will Share Screen With Vijay Sethupathi Arvind Swami Gandhi Talks Teaser Released Silent Film)
आणखी वाचा : लग्नाच्या काही महिन्यांनंतर पती नाही तर 'या' पुरुषासाठी ढसाढसा रडू लागली 'ही' अभिनेत्री!
आता मुकपट म्हणजे काय तर ज्या चित्रपटात संवाद नसतात ते चित्रपट म्हणजे मुकपट... भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया हा मुकपटांनी रचला, आता पुन्हा एकदा 'गांधी टॉक्स'च्या माध्यमातून प्रेक्षकांना हा अनुभव घेता येणार आहे. इतकच नव्हे तर झी स्टुडिओज निर्मित या चित्रपटाचं संगीत ए. आर. रहमान यांचे असणार आहे.
आणखी वाचा : कॅमेऱ्यात कैद झाली कपिल शर्माची अशी चूक ज्यामुळे झाला ट्रोलिंगचा शिकार
महात्मा गांधी यांच्या जयंतीदिवशी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. 'गांधी टॉक्स' या चित्रपटांचे दिग्दर्शन किशोर बेलेकर यांचे आहे. एकंदरित टीझरवरुन हा चित्रपट पैशांच्या खेळावर आधारित असणार आहे. गांधींजींची तीन माकडंही या टीझरमध्ये पाहायला मिळत आहेत. झी स्टुडिओज, क्युरियस डिजिटल (Kyoorious Digital) आणि मुव्ही मिल एंटरटेनमेंट यांची सहनिर्मिती असणारा हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.