Valentine`s Day च्या दिवशी मलायका-अर्जून कपूर दिसले अशा अवस्थेत; फोटो पाहून चाहते हैराण
Valentine Day 2023: मलायका अरोरासोबतचं नाते अर्जुनने कधीही कोणापासून लपवलेलं नाही. मलायका घटस्फोटित असून तिला एक मुलगा आहे. मलायका आणि अर्जुन जवळपास चार वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत.
Malaika Arora Arjun Kapoor Photos: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमीच लाईमलाईटमध्ये असते. अरबाज खान (Arbaaz Khan) याच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर आता मलायका अरोरा (Malaika Arora) सध्या अर्जुन कपूर याला डेट करत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यावर आता शिक्कामोर्तब झालंय. अर्जुन आणि मलायकाचे फोटो इंटरनेटवर नेहमीच व्हायरल होतात. अर्जुन कपूर आणि मलायका ही जोडी बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी आहे. अशातच खुद्द अर्जुन कपूरने एक इन्टाग्राम पोस्ट (Arjun Kapoor Instragram Post) करून प्रेमाची कबुली दिली आहे.
अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोराचे (Malaika Arora) रिलेशन कोणापासूनही लपलेले नाहीत. हे दोघे अनेकदा डिनर आणि पार्टीज करताना दिसतात. मात्र त्या दोघांनी अजूनही आपल्या नात्याबद्दल काहीही सांगितलेलं नाही. अशातच व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने (Valentine's Day Special) अर्जुन कपूरने एक पोस्ट केली आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेला उधाण आल्याचं पहायला मिळतंय.
अर्जुनने एक इन्टाग्राम पोस्ट शेअर केली. त्यात मलायकासोबत तो दिसतोय. डोळ्यांवर गॉगल घातलेली मलायका हातात काचेचा ग्लॅस घेऊन दिसते. तर अर्जुन तिला घट्ट मिठी मारताना दिसतोय. अर्जुनने हा फोटो बदामच्या कॅप्शनसह (Arjun Kapoor drop mushy pictures) शेअर केलाय. खास गोष्ट म्हणजे व्हॅलेन्टाईन डेला अर्जुनने हा फोटो शेअर केल्याने दोघांच्या चाळीशीच्या नात्याची चर्चा आहे.
पाहा पोस्ट -
दरम्यान, अर्जुन याआधी सलमान खानची बहीण अर्पिता खानला (Arpita Khan) डेट करत होता. तो अनेकदा खान कुटुंबाला भेटायला जायचा. मात्र, काही काळानंतर अर्पिता आणि अर्जुनचे ब्रेकअप झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता अर्जुन आणि मलायका यंदा लग्न (arjun kapoor malaika arora khan marriage) करणार की नाही? याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागली आहे.