बदाम आणि अक्रोड खाण्याची असंख्य फायदे आहेत. अनेकांना सुकामेव्यातील हा पदार्थ अतिशय आवडतो. पण पौष्टिक आणि स्वादिष्ट असलेल्या या पदार्थांना खाण्याची योग्य पद्धत मात्र माहित आहे का? हे दोन्ही ड्रायफ्रुट्स कायम सालीसह खाल्ले जातात. मात्र अनेकांना असे वाटतं की, यांच्या सालींमध्ये विष असते. आणि त्यांच्या सेवनामुळे शरीराला अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कदाचित याच कारणामुळे अनेक तज्ज्ञ बदाम आणि अक्रोड भिजवल्यानंतर आणि त्यांची साल काढून खाण्याची शिफारस करतात. हेल्थ कोच आणि न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर प्रियंका सहरावत यांनी बदाम आणि अक्रोड खाण्याची योग्य पद्धत? 


बदाम आणि अक्रोडमध्ये विष असते का? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, अनेक लोक मानतात की अक्रोड आणि बदामांच्या सालींमध्ये विष भरलेले असते आणि ते कच्चे खाणे टाळावे. डॉक्टरांनी सांगितले की त्यांच्या सालीमध्ये विष नसून फायटिक ऍसिड नावाचे संयुग असते.


(हे पण वाचा - Weight Loss Story : महिनाभर पिझ्झा खाऊन घटवलं 6 किलो वजन, ट्रेनरचा दावा)


डॉक्टरांच काय म्हणणं?



फायटिक ऍसिड काय आहे?


फायटिक ऍसिड हे एक संयुग आहे. बदाम आणि अक्रोडमध्ये आढळणारे हे कंपाऊंड पर्यावरणाच्या हानीपासून नटांचे संरक्षण करते, परंतु ते मानवांसाठी विष म्हणून काम करत नाही. बदाम किंवा अक्रोड भिजवून किंवा सोलून खाण्याचा अर्थ असा नाही की, असे केल्याने आपण त्यांचे विष काढून टाकले आहे. फायटिक ऍसिडचे प्रमाण कमी करणे हा एकच अर्थ आहे.


(हे पण वाचा - मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 7 वा दिवस, आठवडाभर फक्त पाणी प्यायल्यास शरीरावर कसा परिणाम होतो?)


खाण्याची योग्य पद्धत?


फायटिक ॲसिड शरीरातील जीवनसत्त्वे आणि खनिजे शोषून घेण्यास अडथळा आणते आणि म्हणूनच नेहमी या गोष्टी भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी खाण्याचा सल्ला दिला जातो जेणेकरून त्याचे प्रमाण कमी करता येईल.


(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)