Real Weight Loss Journey : वजन कमी करायचा हा विचार जरी केला तरी पहिलं आठवतं ते जंक फूड.. कारण या जंक फूडमुळेच अनेकांच वजन वाढल्याची बोंब आहे. असं असताना एका पर्,नल ट्रेनरने चक्क जंक फूड खाऊन महिन्याभरात 6 किलो वजन कमी केलं आहे. एवढंच नव्हे तर सुटलेलं पोटंही आत गेलं आहे.
ब्रिटनमधील 18 वर्षीय पर्सनल ट्रेनर जेडेन लीने आपल्या इन्स्टाग्रामवर वजन कमी करण्याचा प्रवास शेअर केला आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, त्याला हे सिद्ध करायचे होते की, वजन कमी करण्यासाठी जंक फूड आणि प्रोसेस्ड फूड पूर्णपणे सोडून देण्याची गरज नाही, तुम्हाला फक्त कॅलरीजवर लक्ष द्यावे लागते. यासाठी त्याने 30 दिवस दररोज लहान आकाराचा पिझ्झा खाल्ला. ज्यामुळे त्याचं वजन तर कमी झालंच आहे पण सोबतच सुटलेलं पोटही आत गेलंय.
(फोटो सौजन्य - Jayden Instagram)
31 जानेवारी रोजी ट्रेनरचे वजन 161.60 पौंड होते. जे 31 दिवसांनंतर सुमारे 13 पाउंड्सने कमी होऊन 148.37 पौंड झाले. या कालावधीत, त्याने दररोज केवळ 2500 कॅलरी वापरल्या आणि सुमारे 6 किलो वजन कमी केले, ज्यामध्ये त्याच्या पोटाची चरबी गेली. त्याची झोपही सुधारली आणि एनर्जी लेव्हलही सुधारली.
प्रशिक्षकाने सांगितले की, पिझ्झा व्यतिरिक्त, त्याच्या आहारात उच्च प्रथिने, उच्च प्रमाण आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश आहे. जेणेकरुन पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि उर्जेची कमतरता भासत नाही. या पदार्थांमध्ये केळी प्रोटीन पॅनकेक्स, चॉकलेट प्रोटीन ओट्स, भाज्यांसह स्क्रॅम्बल्ड अंडी आणि केळी, मनुका आणि पीनट बटरसह बॅगेल्स यांचा समावेश होता. जेडेन ली म्हणाला की, वजन कमी करण्यासाठी कोणतेही विशिष्ट अन्न सोडण्यापेक्षा व्यायामावर लक्ष केंद्रित करणे अधिक महत्त्वाचे आहे. त्याच्या वजन कमी करण्याच्या दिनचर्यामध्ये 45-मिनिटांच्या उच्च-तीव्रतेच्या व्यायामाचा समावेश होता, ज्यामध्ये कार्डिओ आणि इंटेंसिटी वर्कआउटचा समावेश होता. तो प्रत्येक मीलनंतर जवळपास 10 मिनिटे चालत असे.
झोपेच्या वेळी कोणाला घाम येत नाही किंवा कोणतीही मेहनत करावी लागत नाही. पण तरीही वजन कमी करण्यासाठी झोप तितकीच महत्त्वाची आहे. प्रत्येक व्यक्तीने दररोज 7 ते 8 तास चांगली झोप घेतली पाहिजे. यामुळे वजन वाढण्यास कारणीभूत असणारा ताण आणि रात्री उशिरा येणा-या लालसेपासून आराम मिळतो. चयापचय वेगवान होतो आणि अधिक चरबी जाळली जाते. यामुळे वजन कंट्रोल करण्यास मदत होते.