Chandrayaan 3 Landing LIVE: चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान 3 चे यशस्वी लँडिंग; भारताने इतिहास घडवला

Wed, 23 Aug 2023-6:21 pm,

Chandrayaan 3 Landing Live Updates: चांद्रयानाचा प्रवास तेव्हापासून आतापर्यंत... असंख्य भारतीयांच्या महत्त्वाकांक्षा थेट चंद्रापर्यंत नेणारं किमयागार चांद्रयान 3 आता निर्धारित स्थळी पोहोचणार आहे.

Chandrayaan 3 Moon Landing Live Updates: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (ISRO) चंद्राच्या दिशेनं पाठवलेलं चांद्रयान 3 (Chandrayaan 3) आता चंद्रावर उतरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहे. शास्त्रज्ञांनी प्रचंड मेहनतीनं हाती घेतलेली ही मोहिम आता शेवटच्या टप्प्यात आली असून, हा टप्पा आव्हानात्मक असला तरीही तो अशक्य नाही, असा विश्वास इस्रोप्रमुखांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, बुधवारची संध्याकाळ किंबहुना 23 ऑगस्ट 2023 हा दिवस भारतासाठी आणि संपूर्ण अंतराळ क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. 


इस्रोच्या चांद्रयान 3 मोहिमेच्या (ISRO Moon Mission) निमित्तानं पृथ्वीवरील पहिलाच कृत्रिम उपग्रह चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याची किमया घडणार आहे. अधिकृत माहितीनुसार चांद्रयानातील विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर मॉड्युल बुधवारी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठावर पोहोचतील. चंद्रावरील ही लँडींग यशस्वी ठरल्यास अमेरिका, चीन आणि पूर्व सोवियत संघामागोमाग भारत हे काम करणारा जगातील चौथा देश ठरणार आहे. अशा या चांद्रयानाच्या लँडिंग प्रक्रियेतील सर्व अपडेट्स आणि देशभरातील उत्साहाचं वातावरण एका क्लिकवर... 

Latest Updates

  • चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर  चांद्रयाना 3 चे यशस्वी लँडिंग;  NASA ला जमलं नाही ते ISRO नं करून दाखवलं!

  • Chandrayaan 3 Landing Live Updates: चांद्रयान 3 च्या लँडर मॉड्यूले 21 पृथ्वी 120 वेळा चंद्राला प्रदक्षिणा घातल्या आहेत.  इस्त्रोची टीम लँडिंगसाठी सज्ज

  • हे देखील वाचा - Mission Chandrayaan 3 साठी देशभरात होमहवन-पूजा, पंतप्रधान मोदी आफ्रिकेतून व्हर्च्युअली सहभागी होणार 

  • हे सुद्धा वाचा -  कोण म्हणतं भारताची 'ती' मोहीम फेल ठरली? चांद्रयान-2 च्या मदतीनेच चंद्रावर उतरतेय चांद्रयान-3!

  • हे सुद्धा वाचा  - चांद्रयान 3 च्या लँडिगसाठी 23 ऑगस्टच का निवडण्यात आला? इस्रोचं गणित जाणून घ्या

  • हे सुद्धा वाचा -  चंद्रावर लँडिग करण्यासाठी जागेची निवड कशी होते? ISRO च्या वैज्ञानिकांचा खुलासा

  • हे सुद्धा वाचा -   'चांद्रयान लँडिंग होईपर्यंत...' सीमा हैदरने चांद्रयान मोहिमसाठी ठेवलं 'हे' व्रत

  • हे सुद्धा वाचा -  Chandrayaan 3 : आज लँडिंग झालंच नाही तर? इस्रोकडे एक नव्हे 'हे' 3 प्लॅन

     

  • हेसुद्धा वाचा :  Chandrayaan 3 : आज लँडिंग झालंच नाही तर? इस्रोकडे एक नव्हे 'हे' 3 प्लॅन

  • Chandrayaan 3 Landing Live Updates: इस्रोच्या ऑफिसमधून थेट तुमच्यापर्यंत... 

    चांद्रयान 3 लँडिंगपूर्वी इस्रोच्या कार्यालयात नेमकी काय परिस्थिती आहे, हे इस्रोनंत सोशल मीडियाच्या माध्यमावरून सांगण्यात आलं. 'आम्ही तयार आहोत' असं म्हणत त्यांनी लँडिंग प्रक्रियेची माहिती दिली. 

  • Chandrayaan 3 Landing Live Updates: चांद्रयानाच्या लँडिंगसाठीची जागा कशी निवडली? 

    चंद्रावर लँडिंग करताना जागेची निवड कशी होते, हे तुम्हाला माहिती आहे का? इस्रो स्पेस अॅप्लिकेशन्स सेंटरचे वैज्ञानिक (Isro-Space Applications Centre) आणि फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी (Isro-Space Applications Centre) याबाबत नुकताच खुलासा केला आहे. चांद्रयान 3 च्या लँडिगसाठी जागेची निवड करताना आधीच्या चांद्र मोहिमेचा डेटा आणि माहितींचा आधार घेतला जातो. म्हणजेच चांद्रयान 3 च्या लँडिंगची जागा निवडताना चांद्रयान 1, चांद्रयान 2, सेलेन, अमेरिकेच्या नेतृत्वातील लुनार रिकॉनिसन्स ऑर्बिटर (LRO) मोहीम यांचा अभ्यास करण्यात आला आहे.

     

  • Chandrayaan 3 Landing Live Updates: चांद्रयानाचं लँडिंग आज झालं नाही तर? 

    इस्रोनं पाठवलेल्या चांद्रयान 3 चं लँडिंग आज झालं नाही, तर त्याऐवजी तीन विविध मार्गांचा विविध परिस्थिती अनुसरून अवलंब केला जाईल. चंद्रावरील सूर्योदय, 24 ऑगस्टला तातडीनं लँडिंगसाठीचा दुसरा प्रयत्न आणि आहे त्याच ठिकाणी घिरट्या घालत राहणं असे पर्याय यावेळी उपलब्ध असतील. 

     

  • हेसुद्धा वाचा : Chandrayaan-3 मोहिमेचे खरे सुपर हिरो! 'या' 5 जणांमुळेच चंद्रावर फडकणार तिरंगा; पाहा Photos

     

  • Chandrayaan 3 Landing Live Updates: चांद्रयान 3 लँडिंगसाठी लागणारा वेळ 

    चांद्रयानाची लँडिंग होण्याआधी इस्रोप्रमुखांनी अचिषय महत्त्वाची माहिती देत आतापर्यंततरी ठरलेल्या वेळेतच लँडिंगची प्रक्रिया पार पडणार असल्याचं सांगितलं. चांद्रयान 3 च्या लँडिंगसाठी साधारण अर्ध्या तासाचा म्हणजेच 30 मिनिटांचा कालावधी लागेल असंही ते म्हणाले. जिथं योग्य जागा निवडून तिथं हे लँडिंग केलं जाणार आहे. 

     

  • Chandrayaan 3 Landing Live Updates: तज्ज्ञांचं काय मत? 

    चांद्रयान 3 च्या लँडिंगपूर्वी तज्ज्ञ मंडळींनी त्याबाबतचे आपले तर्कवितर्क वर्तवले आहेत. जाणून घ्या ते म्हणालेत तरी काय? 

  • हेसुद्धा वाचा : Chandrayaan 3 चं रोव्हर किमया करणार; भारताची राजमुद्रा कायमस्वरुपी चंद्रावर उमटणार

     

  • Chandrayaan 3 Landing Live Updates: अप्रतिम नृत्याविष्कार 

    नागपूरमध्ये भरतनाट्यम नृत्यांगना पूजा हिरवडे हिनं चांद्रयान 3 लँडिंगच्या  निमित्तानं एक नृत्याविष्कार सादर केला. तिच्या नृत्याचा हा सुरेख व्हिडीओ. 

  • Chandrayaan 3 Landing Live Updates: चांद्रयानासाठीच सर्वकाही...

    देशाच्या कानाकोपऱ्यातून सध्या चांद्रयानाच्या लँडिंगसाठी प्रार्थना केल्या जात असून, सर्वच नागरिक शक्य त्या सर्व परिंनी चांद्रयानाच्या यशाचीच मनोकामना करत आहेत. वाराणासीमध्येही साधुसंतांनी चांद्रयाच्या सॉफ्ट लँडिंगसाठी यज्ञ केल्याचं पाहाला मिळालं. 

  • Chandrayaan 3 Landing Live Updates: लहरा दो.... 

    चांद्रयान 3 च्या लँडिंगपूर्वी लडाखमध्ये काही तरुण आणि परदेशी नागरिकांनी हाती तिरंगा घेत या मोहिमेसाठी सुरेल शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळालं. सोशल मीडियावर त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला. 

  • Chandrayaan 3 Landing Live Updates: जळीस्थळी काष्ठीपाषाणी चांद्रयान 3 

    University Grants Commission (UGC) कडून सर्व शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालयांमध्ये चांद्रयानाच्या लँडिंग प्रक्रियेचं थेट प्रक्षेपण दाखवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी या लँडिंगचं स्क्रीनिंग होणार आहे. त्यामुळं देशभरात सध्या जळीस्थळी काष्ठीपाषाणी चांद्रयान 3 चीच चर्चा पाहायला मिळत आहे. 

     

  • Chandrayaan 3 Landing Live Updates: देशविदेशातून प्रार्थना सुरु...

    अमेरिकेतील न्यू जर्सी येथे चांद्रयानाच्या यशस्वी सॉफ्ट लँडिंगसाठी एका पुजेचं आयोजन करण्यात आलं. मोन्रो येथील ओम श्री साई बालाजी मंदिराच्या वतीनं ही पूजा संपन्न झाली.  

  • Chandrayaan 3 Landing Live Updates: प्रत्येक घडामोडीकडे देशाचं लक्ष...

    चांद्रयान 3 च्या यशस्वी लॅंडिंगकडे सा-या देशाचं लक्ष लागलंय. वाराणसीच्या सुदामा कुटी आश्रमात होमहवन करत चांद्रयानच्या यशासाठी प्रार्थना केली... सांधूसंत हातात तिरंगा आणि चांद्रयानाचा फोटो घेऊन यशस्वी लॅंडिंगसाठी महादेवाला साकडं घातलंय...

  • Chandrayaan 3 Landing Live Updates: चांद्रयानाच्या लँडिंगसाठी केंद्रीय मंत्री रामदास यांची कविता... 

    भारत देशाचे सर्व सायंटिस्ट आहे आमची जान, म्हणूनच चंद्रावर पोहोचणार आहे चंद्रयान
    आम्हाला आहे सर्व गोष्टींचे भान म्हणूनच नरेंद्र मोदींनी पाठविले आहेत चंद्रावर चंद्रयान.

  • Chandrayaan 3 Landing Live Updates: कशी असेल लँडिंग प्रक्रिया?

    चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडर उतरल्यानंतर तो अधिक सक्रिय होईल. त्याचे रॅम्प उघडून त्यातून प्रग्यान रोव्हर चंद्रावर उतरेल. त्यानंतर विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हर एकमेकांचे फोटो काढून पृथ्वीकडे पाठवतील. चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या 25 किमीवर आहे. ताशी 6 हजार किमी वेगावरून त्याचा वेग शून्यावर आणला जाईल. इस्रोकडून आता वेग कमी करण्याची प्रक्रिया सुरू झालीय. भारताच्या या कामगिरीकडे सगळ्या जगाचं लक्ष आहे. चांद्रयान 3 मधील सर्व यंत्रणा व्यवस्थात सुरू असल्याबद्दल इस्रोकडून वारंवार तपासणी केली जात आहे. लँडींगमध्ये काही अडचण जाणवल्यास आजच्या ऐवजी 27 ऑगस्टला लँडिंगचा पर्यायही इस्रोने ठेवला आहे. 

     

  • Chandrayaan 3 Landing Live Updates: देशभरात चांद्रयान 3 लँडिंगचा उत्साह पाहायला मिळत असून, देशातील नागरिक शक्य त्या सर्व परिंनी या ऐकिहासिक दिवसाचा सोहळा करताना दिसत आहेत. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link