Chandrayaan 3 : आज लँडिंग झालंच नाही तर? इस्रोकडे एक नव्हे 'हे' 3 प्लॅन

Chandrayaan 3 Landing : आज Chandrayaan 3 चं लँडिंग झालंच नाही तर? मदतीसाठी इस्रोकडे 'हे' तीन मार्ग. पाहा त्या तीन पर्यायांचा वापर कोणच्या परिस्थितीत केला जाईल.   

सायली पाटील | Updated: Aug 23, 2023, 11:23 AM IST
Chandrayaan 3 : आज लँडिंग झालंच नाही तर? इस्रोकडे एक नव्हे 'हे' 3 प्लॅन title=
Chandrayaan 3 misses soft landing today then what 3 possiblities

Chandrayaan 3 Landing : इस्रोनं (ISRO) अवकाशात थेट चंद्राच्याच दिशेनं पाठवलेलं चांद्रयान 3 आता मोठा प्रवास पूर्ण करून चंद्राच्या पृष्ठानजीक पोहोचलं आहे. बुधवारी (23 ऑगस्ट 2023) ला या चांद्रयाचाची लँडिंग असल्यामुळं आता सर्वांचीच धाकधुक वाढली आहे. त्यातच इस्रोप्रमुख एस सोमनाथ यांनी मात्र देशातील सर्वच नागरिकांना विश्वास देत ही मोहिम कोणत्याही परिस्थितीत यशस्वी ठरेल असंही म्हटलं आहे. त्यामुळं या मोहिमेककडून अनेकांच्याच अपेक्षा वाढल्या आहेत. 

चांद्रयान अपयशी ठरणारच नाही... 

चांद्रयान 2 (Chandrayaan 2) ला मिळालेल्या अपयशानंतर काही गोष्टींवर काम करून इस्रो पूर्ण तयारीनिशी चांद्रयान 3 सह सज्ज झालं. चंद्रावर ते अतिशय सुरक्षितरित्या लँडिंग करेल अशीच हमी इस्रो प्रमुखांनी दिली. सेन्सरनं काम करणं बंद केलं, इंजिन थांबलं तरीही इस्रोचं हे विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठावर पोहोचणार आहे. पण, इथंही माशी शिंकली तर? इस्रोच्या सर्व शक्यतांना शह देत इथंही काहीतरी बिनसलं तर? या परिस्थितीचा विचार करूनही भारतीय अंतराळ संशोधन संस्था सज्ज आहे. त्यासाठी एक नव्हे, तीन प्लॅन तयार ठेवण्यात आले आहे. 

- चंद्रावरील सूर्योदय 

बुधवारी चांद्रयान सॉफ्ट लँडिंगमध्ये अपयशी ठरलं, तर पुढच्या प्रयत्नांसाठीच्या शक्यता पुढील 14 दिवस उपलब्ध असतील. चंद्रावरील एक दिवस हा पृथ्वीवरील 14 दिवसांसमान आहे. त्यामुळं ही पुढली संधी थेट चंद्रावरील नव्या दिवशी म्हणजे 14 दिवसांनंतर इथं होणाऱ्या सूर्योदयाच्या वेळी उपलब्ध होईल. 

- 24 ऑगस्टला तातडीनं दुसरा प्रयत्न 

पहिल्या प्रयत्नांत चांद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवापर्यंत पोहोचण्यास अपयशी ठरलं तर, 24 ऑगस्ट 2023 ला तातडीनं दुसरा प्रयत्न केला जाईल. त्यावेळी सायंराळी 5 वाजून 45 मिनिटांनी लँडिंगचा प्रयत्न करत पुन्हा यानाच्या अंतर्गत उपकरणांची चाचणी घेतली जाईल. पुढील 17 मिनिटं चांद्रयान लँडिगसाठी प्रयत्न करेल. 

हेसुद्धा वाचा : Chandrayaan 3 LIVE: 5...4...3...2...1 चांद्रयान 3 चंद्रावर उतरण्याच्या तयारीत; देशभरात उत्साह 

- चांद्रयान 3 आहे त्याच ठिकाणी घिरट्या घालत राहील 

सर्व पर्याय अपयशी ठरल्यास चांद्रयान 3 सध्या आहे तिथं म्हणजेच चंद्रापासून 25 किमी X 134 किमी अंतरावर घिरट्या घालत राहील. त्यामुळं ही मोहिम अपयशी ठरणं जवळपास अशक्यच आहे. कारण, इस्रोचा प्लॅन B सुद्धा तयार आहे. तेव्हा आता या प्लॅनचा वापर करावा लागणार की, पहिल्याच वेळी लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.