Chandrayaan-3 मोहिमेचे खरे सुपर हिरो! 'या' 5 जणांमुळेच चंद्रावर फडकला तिरंगा; पाहा Photos

Top 5 Scientist From ISRO of  Chandrayaan 3:  चंद्रयान-3 मोहिमेतील लँडर मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरलं आहे. आजचा दिवस भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी नोंदवला गेला आहे. 23 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडींग केलं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान लँड करणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे. मात्र भारताच्या नावावर हे यश नोंदवण्याचं सर्व श्रेय भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या काही प्रमुख वैज्ञानिकांना जातं. चांद्रयान-3 मोहिमेतील पडद्यामागील चेहरे कोण आहेत पाहूयात...

| Aug 23, 2023, 19:13 PM IST
1/12

एस. सोमनाथ

Scientist From ISRO Involved In Chandrayaan 3 Moon Mission

एस. सोमनाथ (S Somanath) - इस्रोचे अध्यक्ष असलेले एस. सोमथान हे चांद्रयान-3 मोहिमेतील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक आहेत. एस. सोमनाथ यांनी या मोहिमेसाठी फार मेहनत घेतली आहे.  

2/12

एस. सोमनाथ

Scientist From ISRO Involved In Chandrayaan 3 Moon Mission

यापूर्वी एस. सोमनाथ यांनी विक्रम साराभाई अंतराळ केंद्र आणि तरल प्रणोद प्रणाली केंद्र- अंतराळ संशोधन या रॉकेटसंदर्भातील प्राथमिक विकास केंद्रांचे निर्देशक म्हणून काम पाहिलं आहे. 

3/12

एस. सोमनाथ

Scientist From ISRO Involved In Chandrayaan 3 Moon Mission

एस. सोमनाथ यांनी इस्रोचं अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर चांद्रयान-3, आदित्य एल 1 (सोलार मिशन) आणि गगनयानसारख्या महत्त्वाच्या मोहिमांना गती मिळाली आहे.

4/12

पी. वीरमुथुवेल

Scientist From ISRO Involved In Chandrayaan 3 Moon Mission

पी. वीरमुथुवेल (P Veeramuthuvel) - पी. वीरमुथुवेल हे इस्रोच्या चांद्रयान-3 मोहिमेचे परियोजना निर्देशक आहेत. त्यांनी 2019 रोजी चांद्रयान-3 मोहिमेच्या निर्देशक पदाचा कारभार पदभार स्वीकारला होता. 

5/12

पी. वीरमुथुवेल

Scientist From ISRO Involved In Chandrayaan 3 Moon Mission

पी. वीरमुथुवेल हे सध्या इस्रोच्या मुख्य कार्यालयामधील स्पेस इन्फ्रास्ट्रक्चर प्रोग्रामसाठी उप-निर्देशक म्हणून काम पाहत आहेत. पी. वीरमुथुवेल यांनी चांद्रयान-2 मोहिमेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

6/12

मोहन कुमार

Scientist From ISRO Involved In Chandrayaan 3 Moon Mission

मोहन कुमार (Mohan Kumar): चांद्रयान-3 मोहिमेचे निर्देशक म्हणून मोहन कुमार काम पाहत आहेत. मोहन कुमार हे विक्रम साराभाई अंतराळ केंद्रातील वरिष्ठ वैज्ञानिक आहेत.

7/12

मोहन कुमार

Scientist From ISRO Involved In Chandrayaan 3 Moon Mission

मोहन कुमार यांनी यापूर्वी एलव्हीएम3-एम3 मोहिमेअंतर्गत वन वेब इंडिया 2 उपग्रहांचं यशस्वी उड्डाण करण्यासाठी निर्देशक म्हणून काम पाहिलं होतं.

8/12

एम. शंकरन

Scientist From ISRO Involved In Chandrayaan 3 Moon Mission

एम. शंकरन (M Sankaran) - एम. शंकरन हे यू. आर. राव सॅटेलाइट सेंटरचे निर्देशक आहेत. हे केंद्र इस्रोसाठी सर्व उपग्रहांची निर्मिती करण्याचं काम करतं. हे काम एम. शंकरन यांच्या देखरेखीखाली होतं.  

9/12

एम. शंकरन

Scientist From ISRO Involved In Chandrayaan 3 Moon Mission

सध्या एम. शंकरन हे सध्या त्या टीमला मार्गदर्शन करत आहेत जी टीम भारताला आवश्यक असलेल्या उपग्रहांची निर्मिती करते.

10/12

एस. उन्नीकृष्णन नायर (S Unnikrishnan Nair)

एस. उन्नीकृष्णन नायर (S Unnikrishnan Nair)

एस. उन्नीकृष्णन नायर (S Unnikrishnan Nair) - एस. उन्नीकृष्णन नायर हे विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे निर्देशक आहेत.

11/12

एस. उन्नीकृष्णन नायर

एस. उन्नीकृष्णन नायर

चांद्रयान-3 अवकाशामध्ये लॉन्च करण्यामध्ये जियोसिंक्रोनस सैटेलाइट लॉन्च व्हीकल (GSLV) मार्क-III म्हणजेच लॉन्च व्हीकल मार्क-III च्या निर्मितीमध्ये एस. उन्नीकृष्णन नायर यांच्या टीमने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

12/12

Scientist From ISRO Involved In Chandrayaan 3 Moon Mission

चांद्रयान-3 मोहिमेमध्ये 54 महिला इंजिनिअर्स आणि वैज्ञानिकांनी काम केलं आहे. इस्रोच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अनेक वेगवगेळ्या गोष्टींच्या जडघडणीमध्ये आणि नियोजनामध्ये महिलांचं योगदान मोलाचं राहिलं आहे. (फाइल फोटो)