स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : सध्या लोक गैर पद्धतीने पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असतात. या धक्कादायक प्रकारांमध्ये अनेकदा जीव गमावणायची देखील शक्यता असते. हल्ली हे गुन्हे प्रत्यक्ष न करता अप्रत्यक्षपणे मोबाईलवरुन केले जातात. या अपराधांमध्ये एकापेक्षा अधिक लोकांचा समावेश असतो. हे अपराध घडवणारे आपल्या आसपासच असतात त्यामुळे या मोबाईलच्या जगात अधिक सावध होणे गरजेचे झाले आहे. अशीच एक घटना समोर आली आहे ज्यामुळे अनेकांचे मोबाईलवरुन होणाऱ्या गुन्ह्यांची नोंद घेता येईल. (Shocking case of sex racket, 72-year-old man was blackmailed out of lakhs of rupees nz)



हे ही वाचा - बिश्नोई गँगच्या निशाण्यावर 'बिग बॉस', 'भाईजान'च्या जीवाला धोका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


ही घटना सीबीडी बेलापूर येथे घडली आहे. ही व्यक्ती फक्त व्हॅाट्सअप व्हिडिओ कॅालमुळे अडचणीत आली होती. एका ७२ वर्षीय वृध्द व्यक्तीस २२ ॲाक्टोंबर रोजी एका महिलेने व्हिडियो कॅाल केला होता. फोन उचलताच संबंधीत महिलेने आपल्या अंगावरील कपडे काढून वृध्दास आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. महिलेचे चाळे बघून लगेच त्या वृद्ध व्यक्तीने व्हिडीओ कॅाल बंद केला.


हे ही वाचा - गाव तिथे शाखा... घर तिथे स्वराज्य...,  संभीजीराजेंचा राज्यभर दौरा!



मात्र काही मिनिटांत या ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाईल वर महिलेने video कॅाल चे फोटो पाठवले. त्या फोटोमध्ये आक्षेपार्य महिलेस आपण बघत असल्याचे लक्षात येताच ज्येष्ठ नागरिक घाबरला. यानतंर पुढील एक आठवडा संबंधीत महिला आणि तीचे साथीदार विक्रम राठोड , संजय सिंग हे नेहमी त्या वृद्ध व्यक्तीस फोन करुन ब्लॅकमेल करत असत. आतापर्यंत त्या टोळीने ज्येष्ठ नागरिकाकडून १ लाख ७० हजार रूपये उकळले होते.


हे ही वाचा - राहुल गांधींची भारत जोडो यात्रा 'या' तारखेला महाराष्ट्रात, शरद पवार आणि उद्धव ठाकरे सहभागी होणार?



पैसे देऊनही आरोपी  पिछा सोडत नसल्याने अखेर ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने सीबीडी पोलीस ठाण्यात धाव गेतली आणि त्या तीन आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलीसांनी आलेल्या फोन नंबरचा तपास केला असता ते मध्यप्रदेश आणि राजस्थान येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे.