मुंबई: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालावरून भाजपच राज्यात प्रथम क्रमांकाचा पक्ष असल्याचे सिद्ध झाले आहे. नागपूरमध्येही आमचा मोठा पराभव वैगेरे झाला, यामध्ये काही तथ्य नाही. मात्र, काहीजण दुसऱ्याच्या घरी मुलगा झाला म्हणून पेढे वाटत आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी त्यांनी जिल्हा परिषद निकालाचे विश्लेषण करताना आमच्या जागा ५२ वरून १०६ झाल्या. तर नागपूरमध्ये गेल्यावेळी आमच्याकडे २२ जागा होत्या, शिवसेनेने आठ जागा जिंकल्या होत्या. आता आमच्या केवळ सहा जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळे आमचा मोठा पराभव वैगेरे झाला, यामध्ये तथ्य नाही, असे फडणवीसांना स्पष्ट केले. 


तुम्हाला रामभाऊ म्हाळगीमध्ये सवलतीत ट्रेनिंग देऊ; शेलारांचा राऊतांना टोला


राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्र आल्यानंतरही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपच पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. अचानक निवडणुका आल्याने आम्हाला तयारीला वेळ कमी पडला. अन्यथा तर निकाल अजून काही वेगळा लागला असता. परंतु या निकालाने जनता आमच्या पाठिशी आहे, हे सिद्ध झाले. त्यामुळे इतरांच्या घरी मुलगा झाला म्हणून काही लोक पेढे वाटत आहेत. त्यांनी ते बंद करावे, असा टोलाही फडणवीसांनी जयंत पाटील यांना लगावला. 


RSS विचारसरणीच्या कुलगुरूंना पदावरून हटवा- आशिष देशमुख


यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मनसेशी युती करणार का, या प्रश्नाचेही उत्तर दिले. सध्या मनसे आणि भाजपने एकत्र येण्याबाबत कोणतीही चर्चा केलेली नाही. मात्र, भविष्यात मनसेने अधिक व्यापक भूमिका घेऊन कार्यपद्धतीत बदल केला तर युतीचा विचार होऊ शकतो, असे फडणवीस यांनी सांगितले.