जेव्हा गजराजला राग येतो... गणपती बाप्पा!
सिलीगुडी: पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी नॅशनल पार्कमध्ये हत्तीचा राग पाहायला मिळाला. दोन बाईकस्वार गजराजच्या पायाखाली येण्यापासून बचावले.
नॅशनल पार्कच्या रस्त्यावर एक जंगली हत्ती रागानं धुमाकूळ घालतांना दिसला. यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी येणाऱ्या लोकांचं येणं-जाणं थांबविण्यात आलं.
यादरम्यान थांबवलं तरी दोन बाईकस्वार त्या दिशेनं निघाले. रागावलेल्या हत्तीनं बाईकस्वारांचा रस्ता अडवला आणि त्यांना पायाखाली घेण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघं जणं पळून जाण्यात यशस्वी झाले. पण बाईकचा मात्र हत्तीनं चुराडा केला.
जलपाईगुडी जिल्ह्यातील लतागुडीचं गोरुमारा नॅशनल पार्क जगभरात प्रसिद्ध आहे आणि इथलं नैसर्गिक सौंदर्य, जंगली प्राण्यांना पाहण्यासाठी कानाकोपऱ्यातून लोकं येत असतात.
पाहा व्हिडिओ-
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
जेव्हा गजराजला राग येतो... गणपती बाप्पा!