ICC Test Team 2022 : आयसीसीने मंगळवारी गेल्या वर्षीचे सर्वोत्कृष्ट संघ जाहीर केले आहेत. अशातच आयसीसीने कसोटी संघाची घोषणा केली असून यामध्ये टीम इंडियाच्या एकाच खेळाडूला स्थान मिळवता आलं आहे. टीम इंडियाचा विकेट कीपर ऋषभ पंतचा या संघामध्ये समावेश आहे. (ICC Mens Test Team of the Year 2022 revealed latest marathi Sport News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाच्या चार खेळाडूंचा यामध्ये समावेश असून सलामीवीर उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, पॅट कमिन्स आणि नॅथन लियोन हे आहेत.  इंग्लंडच्या तीन खेळाडूंनी यामध्ये स्थान मिळवलं असून जॉनी बेअस्टो, बेन स्टोक्स आणि जेम्स अँडरसन यांचा समावेश आहे.  या संघाचा कर्णधार इंग्लंडच्या बेन स्टोक्सला करण्यात आलं आहे. 


ICC कसोटी संघ 2022 :  उस्मान ख्वाजा (ऑस्ट्रेलिया), कार्लोस ब्रेथवेट, मार्नस लाबुशेन (ऑस्ट्रेलिया), बाबर आझम (पाकिस्तान), जॉनी बेअस्टो (इंंग्लंड), बेन स्टोक्स (C) (इंंग्लंड), ऋषभ पंत भारत (W), पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया), कगिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका), नॅथन लियोन (ऑस्ट्रेलिया) आणि जेम्स अँडरसन (इंंग्लंड)


ICC वनडे संघ 2022 : बाबर आझम (कप्तान) पाकिस्तान, ट्रैविस हेड- ऑस्ट्रेलिया, शाई होप- वेस्ट इंडिज, श्रेयस अय्यर- भारत, टॉम लाथम (विकेटकीपर)- न्यूझीलंड, सिकंदर रजा- झिम्बाब्वे, मेहदी हसन मिराज-बांग्लादेश, अल्जारी जोसेफ- वेस्ट इंडिज, मोहम्मद सिराज- भारत, ट्रेंट बोल्ट- न्यूजीलैंड, एडम झम्पा- ऑस्ट्रेलिया


ICC टी-20 संघ 2022 :
जॉस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), मोहम्मद रिझवान, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ग्लेन फिलिप्स, सिकंदर रझा, हार्दिक पांड्या, सॅम कुरन, वानिंदू हसरंगा, हरिस राऊफ, जोश लिटल.