Ashish Nehra on Shubhman Gill ​: T20 World Cup मध्ये दारुण पपारभवानंतर भारतीय क्रिकेट (Indian Cricket) संघ बऱ्याच बदलांचा सामना करताना दिसत आहेत. संघामध्ये इतर सदस्य, प्रशिक्षकांमध्ये केला जाणारा बदल असो किंवा मग निवड समिती बरखास्त होणं असो. हे बदल सर्वार्थानं क्रिकेट जगतामध्ये एक नवी पहाट आणणारे असले तरीही त्या रोखानं संघाचा प्रवास कसा होतो हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. 2024 मध्ये असणाऱ्या टी20 वर्ल्ड कपपूर्वी भारतीय संघाचा न्यूझीलंड ( IND vs NZ ) दौरा हे त्याच दृष्टीनं टाकलं जाणारं पहिलं पाऊल आहे. किंबहुना काही क्रीडारसिकांना तर, या संघाकडून धोनीच्या यंग ब्रिगेडनं केलेल्या कामगिरीसम खेळाचीच अपेक्षा आहे. 


भारतीय संघाच्या जमेच्या गोष्टी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकिकडे भारतीय संघातील खेळाडू न्यूझीलंडशी दोन हात करत असतानाच इथे स्थानिक पातळीवर पृथ्वी शॉ (Prithwi shaw), ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) यांसारखे खेळाडू भारतीय संघाच्या फलंदाजीची फळी नेमकी किती भक्कम आहे हे दाखवून देताना दिसत आहेत. पण, हे दोघंही खेळाडू संघाती नव्या जोमाच्या एका उगवत्या ताऱ्यापुढे फिके आहेत अशा आशयाचं वक्तव्य आशिष नेहरा यानं केलं आहे. (Indian bowler ashish nehra on shubhman gill prithwi shaw and ruturaj gaikwad)


काय म्हणाला नेहरा? (Ashish nehra on shubhman gill)


गोलंदाजीच्या बळावर अनेकांसाठी आदर्शस्थानी असणाऱ्या नेहरानं गिलविषयी म्हटलं, 'शुभमन गिल एक असा खेळाडू आहे, जो 50 षटकांच्या आणि कसोटी सामन्यांमध्ये दमदार शतकं लगावू शकतो. परिस्थितीसोबत ताळमेळ साधत त्या अनुषंगानं खेळणं त्याला जमतं आणि आतापर्यंत तो तेच करत आला आहे.'


हेसुद्धा वाचा : सिक्सरवरsss सिक्सरsss! बॉलरला आस्मान दाखवणारा ऋतुराज जमीनीवरच, धोनीबाबत म्हणाला...


पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड या खेळाडूंची नावंही सध्या चर्चेत आहेत. पण, शुभमन गिल बराच पुढे आहे आणि याबाबत कोणालाही शंका नाही, असं म्हणत त्यानं आपलं म्हणणं पटवून दिलं. 



IPL2022 मधील शुभमनच्या कामगिरीचा नेहरावर प्रभाव 


गुजरातच्या संघामधून खेळणाऱ्या शुभमन गिल च्या खेळानं नेहरावर बराच प्रभाव टाकला होता. भारतीय संघासाठीसुद्धा त्यानं उल्लेखनीय कामगिरी केली होती. वेस्ट इंडिजमध्ये त्यानं 205 धावा केल्या होत्या. तर, झिंम्बाब्वेमध्ये त्यानं 245 धावांचा डोंगर उभा केला होता. इथंच त्यानं शतकही झळकावलं होतं. शुभमन गिलचा एकंदर फॉर्म आणि नेहरानं त्याच्यावर ठेवलेला विश्वास पाहता तो आपली कामगिरी नेमकी कशी गाजवतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.