IND vs AUS 1st Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात खेळवला जात असलेला पहिला सामना आता रोमांचक स्थितीत पोहोचला आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma Century) याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अप्रतिम प्रदर्शन केलं. रोहितने मागच्या मोठ्या काळापासून कसोटी क्रिकेटमध्ये शतक केलं नव्हतं. पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अखेर कसोटी फॉरमॅटमधील रोहितच्या शतकाचा दुष्काळ संपला. रोहितने 177 चेंडूत 14 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने हे शतक साकारलं. त्यामुळे आता रोहितचं कौतूक होताना दिसतंय.


रोहितचा नवा रेकॉर्ड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्णधार रोहित शर्माने शतकासह जबरदस्त कारनामा केला आहे. कॅप्टन म्हणून शतक करण्याऱ्यांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर दुसरं स्थान पटकावलं आहे. तर भारताचा कर्णधार म्हणून कसोटी, एकदिवसीय, T20 मध्ये शतक झळकावणारा रोहित शर्मा पहिला भारतीय ठरला.



दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू तेव्हा कर्णधार रोहित शर्मासोबत रविचंद्रन अश्विन मैदानात तंबू गाडून उभे होते. दोन्ही फलंदाजांना चांगली भागीदारी करून टीम इंडियाला चांगली आघाडी वाढवायला मदत केली. त्यानंतर विराट कोहलीने मैदानात आपल्यावर रोहितला साथ देण्याचा प्रयच्न केला. मात्र मर्फीने विराटला माघारी पाठवलं तर डेब्यु मॅन सूर्याला देखील तंबुत पाठवण्याचं काम नेथन लायनने केलंय.


आणखी वाचा - Ravindra Jadeja Ball Tampering : "...म्हणून मी ती ट्रिक वापरली", अखेर रविंद्र जडेजाचं स्पष्टीकरण!


दरम्यान, पहिल्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 177 धावांमध्ये संपवला होता. त्यानंतर दिवसअखेर 1 बाद 77 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने आत्तापर्यंत 224 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता भारताने सामन्यात 47 धावांची आघाडी मिळवली आहे. कॅप्टन रोहित शर्मा 117 धावांवर खेळत असून दुसऱ्या बाजूने जडेजा 33 धावांवर खेळतोय.