Hockey World Cup 2023 Goalkeeper PR Sreejesh: हॉकी वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारतीय संघाकडून क्रीडाप्रेमींना मोठ्या अपेक्षा आहे. वर्ल्डकप स्पर्धेतील 48 वर्षांचा दुष्काळ जेतेपदानंतर दूर होईल, असा आशावाद देखील आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्याने क्रीडाप्रेमींच्या अपेक्षा देखील वाढल्या आहे. तसेच मैदानात उपस्थित राहून प्रेक्षक उत्साह वाढवत असल्याने खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावला आहे. असं असताना भारतीय हॉकी संघातील रणनिती चर्चेचा विषय ठरत आहे. भारताचा दिग्गज गोलकीपर पीआर श्रीजेश याने प्रशिक्षक ग्राहम रेड यांच्या रणनितीचं कौतुक केलं आहे. क्रीडाप्रेमीही मुख्य प्रशिक्षक यांची रणनितीचं सर्वत्र कौतुक करत आहे. आतापर्यंत वर्ल्डकप स्पर्धेत भारताने दोन सामने खेळले आहेत. या दोन्ही सामन्यात एक खास रणनिती दिसून आली. गोलकीपर श्रीजेश आणि पठाण यांनी आलटून पालटून दोघांनी गोलरक्षकाची भूमिका बजावली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनी स्पेन आणि इंग्लंडविरुद्ध आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यांमध्ये पर्यायी क्वार्टरमध्ये श्रीजेश आणि पठाण यांना गोलरक्षकाची संधी दिली. श्रीजेशला पहिल्या आणि तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय गोलरक्षकाची भूमिका बजावली. तर पाठकने सामन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये धुरा सांभाळली. 


बातमी वाचा- Hockey World Cup 2023 स्पर्धेदरम्यान भारताला धक्का, मिडफिल्डर हार्दिक सिंगबाबत मोठी बातमी


“विश्वचषक स्पर्धा रंगात आली असून गोलरक्षक म्हणून आम्हाला कुठेही मागे राहायचं नाही. पुढच्या टप्प्यासाठी एकत्र तयारी करायची होती. दोन गोलरक्षकांपैकी एकाला काही झाले तर दुसर्‍यानं तयार राहणं आवश्यक. त्यामुळे ही एक चांगली रणनीती आहे. प्रत्येक क्वॉर्टरमध्ये गोलकीपर बदल केला जात असल्याने पुरेसा अनुभव आणि वेळ मिळत आहे. भविष्याच्या दृष्टीकोनातून ही चांगली बाब आहे.” असं गोलकीपर पीआर श्रीजेश याने सांगितलं. 


बातमी वाचा- Hockey WC 2023: आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन 'हा' नियम बदलण्याच्या विचारात, कारण...


भारताची हॉकी वर्ल्डकपमधील स्थिती


ग्रुप डी मध्ये भारत, वेल्स, इंग्लंड आणि स्पेन हे चार संघ आहेत. इंग्लंड आणि भारताने एक एक सामना जिंकला आहे. तर भारत विरुद्ध इंग्लंड हा सामना बरोबरीत सुटल्याने प्रत्येकी एक गुण मिळाला आहे. भारत आणि इंग्लंडच्या पारड्यात प्रत्येकी तीन गुण आहेत. मात्र इंग्लंडची गोलची संख्या पाहता पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी पुढील सामना महत्त्वाचा आहे. 19 जानेवारील इंग्लंड विरुद्ध स्पेन आणि भारत विरुद्ध वेल्स हा सामना रंगणार आहे. ग्रुप डी मधील सलामीच्या संघाला थेट उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळणार आहे.