Sanju Samson, Ireland: भारतीय क्रिकेट टीमचा (Cricket Team India) युवा खेळाडू संजू सॅमसन (Sanju Samson) सध्या बराच चर्चेत आहे. नुकतंच टी-20 वर्ल्डकपनंतर झालेल्या न्यूझीलंडच्या (IND vs NZ) दौऱ्यामध्ये त्याचा समावेश करण्यात आला होता. मात्र त्याला एकाच सामन्यात प्लेईंग 11 मध्ये जागा देण्यात आली. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND VS AUS) देखील त्याला संधी देण्यात आली नाही. त्यामुळे आता संजू सॅमसन टीम इंडियाला (Sanju Samson Retirement) टाटा गुड बाय करण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या 2 कसोटी सामन्यांव्यतिरिक्त एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. वनडे मालिकेसाठी 18 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या मालिकेसाठी वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) तब्बल 10 वर्षांनंतर संघात परतला आहे. तर दुसरीकडे संजू सॅमसनची निवड झाली नाही. त्यामुळे आता संजू मोठा निर्णय घेण्याच्या प्रतिक्षेत असल्याचं म्हटलं जातंय.


Sanju Samson कोणत्या देशाकडून खेळणार?


अलीकडेच आयर्लंड (Ireland Cricket) क्रिकेटने संजू सॅमसनला आपल्या संघाकडून खेळण्याची ऑफर दिली होती. आयरीश बोर्डाकडून या भारतीय खेळाडूला प्लेईंग 11 मध्ये समावेश करण्याची हमी देखील देण्यात आली होती. मात्र, संजूने हा प्रस्ताव फेटाळून लावल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे आता संजू मोठा निर्णय घेणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.


आणखी वाचा - Viral Video: LIVE सामन्यात Mohammad Amir चं अश्लील कृत्य, Shahid Afridi ला खणखणीत प्रत्युत्तर!


सध्या टीम इंडियाच्या एकाएका जागेसाठी खेळाडूंमध्ये चुरसेची लढाई होताना दिसत आहे. संजू हा मुळचा नंबर तीनचा खेळाडू मात्र, त्याला अनेकदा कोणत्याही स्थानी आपली कामगिरी दाखवून द्यावी लागली. काही सामन्यात त्याला अपयश नक्की मिळालं मात्र, अनेकदा त्याने आपली चमकदार कामगिरीने अनेकांना आश्चर्यचकित देखील केलंय.


संजू सॅमसनचं आंतरराष्ट्रीय करियर (International career of Sanju Samson)


दरम्यान, संजू सॅमसनने (Sanju Samson)) आतापर्यंत फर्स्ट क्लास करियरमध्ये एकूण 55 सामने खेळले आहे. ज्यामध्ये त्याने 37.64 च्या सरासरीने फलंदाजी करत 3162 रन्स केले आहेत. ज्यामध्ये 10 शतकं आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे.