Mohammad amir vs shahid afridi psl 2023 : पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL 2023) रंगतदार सामने पहायला मिळत आहेत. रविवारी म्हणजेच 19 फेब्रुवारीला कराची किंग्ज आणि लाहोर कलंदर्स (Karachi Kings vs Lahore Qalandars) यांच्यात रोमांचक सामना रंगला. या सामन्यात कराची किंग्जचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर (Mohammad Amir) याने जे काही कृत्य केलं. ते पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद अफ्रिदीला (Shahid Afridi) मोहम्मद आमीरने प्रत्युत्तर दिल्याची चर्चा होताना दिसत आहे.
कराची किंग्ज आणि लाहोर कलंदर्स यांच्यात सामना सुरू होता. त्यावेळी कॅप्टनने आमीरच्या हातात बॉल सोपवला. त्यावेळी आमीरच्या स्पीडपुढे कोणत्याही फलंदाजाला टिकता आलं नाही. आमीरने शाई होपचा (Shai Hope) विकेट काढल्यानंतर जंगी सेलिब्रेशन (Mohammad Amir Celebration) केलं. त्यावेळी त्याने अश्लिल कृत्य केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
Mohammad Amir has clearly ignored Shahid Afridi's advice#KKvsLQpic.twitter.com/gmNmA7LjXQ
— Cricket Pakistan (@cricketpakcompk) February 19, 2023
खेळाडू परफॉर्म करो अथवा ना करो, मी खेळाडूंना कॉल करण्यासाठी स्वत: मेसेज करतो, असं अफ्रिदी सांगतो. पुढे बोलताना तो म्हणतो की, मी आमीरशी आदराने बोललो, सोबतच मी त्याला काही शिव्याही दिल्या. 'तुला नेमकं काय पाहिजे? तुला या देशात खूप आदर मिळाला आहे. तुझी इमेज डागाळली होती. तु अपशब्द वापरतोस हे पाहून काही चाहते निराश झाले आहे, असं आफ्रिदी आमीरला (Shahid Afridi to Mohammad Amir) म्हणाला होता.
दरम्यान, आफ्रिदीच्या फोनचं उत्तर आमीरने मैदानात विकेट काढून दिलं, असं पाकिस्तान क्रिकेटने ट्विट करत म्हटलं आहे. मैदानावरील घाणेरड्या वर्तनाबद्दल आफ्रिदीने आमीरला फटकारलं होतं. त्यानंतर आता पुन्हा आमीरच्या आश्लिल हावभावामुळे तो पुन्हा चर्चेच्या वर्तुळात आला आहे. त्यामुळे आमीरवर कारवाई होणार का? असा सवाल आता क्रिडाविश्वात (Cricket News) विचारला जातोय.