Good News : दहावीच्या विद्यार्थ्यांना घरपोच मिळणार मार्कशीट

दहावीच्या मार्कशीटबाबत ( Marksheet) गुडन्यूज आहे. दहावीची मार्कशीट मिळवण्यासाठी आता धावपळ करावी लागणार नाही.  

Updated: Dec 22, 2020, 10:00 AM IST
Good  News : दहावीच्या विद्यार्थ्यांना घरपोच मिळणार मार्कशीट  title=

मुंबई : दहावीच्या मार्कशीटबाबत ( Marksheet) गुडन्यूज आहे. दहावीची मार्कशीट मिळवण्यासाठी आता धावपळ करावी लागणार नाही. विद्यार्थ्यांना मार्कशीट (Students Marksheet) घरपोच देण्याची सोय परीक्षा मंडळाने केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता दहावीची मार्कशीट (10th standard Marksheet) घरीच मिळणार आहे.

कोणत्याही व्यक्तीला यापुढे चार वेळा ऑनलाईन मार्कशीट (Marksheets will be available online) मागविता येणार आहे. hhtp://kseeb.kar.nic.in या संकेत स्थळावरून आपले गुणपत्रक मागवता येणार आहे. सरकारी कामांसह नोकरी मिळविण्यासाठी दहावीची मार्कशीट गरजेची असते तर ही मार्कशीट वेळेत न मिळाल्याने अनेकांची कामे अडून राहतात. मात्र यापुढे मार्कशीट ऑनलाईन मिळवता येणार असल्याने अनेकांचा त्रास  कमी होणार आहे.