नाशिक जिल्ह्यात आणि कर्नाटकात शाळा सुरु करण्याचा निर्णय

  नाशिक (Nashik) जिल्ह्यातील शाळा (school) चार जानेवारीपासून सुरू होणार आहेत. 

Updated: Dec 19, 2020, 11:11 PM IST
नाशिक जिल्ह्यात आणि कर्नाटकात शाळा सुरु करण्याचा निर्णय  title=
Pic Courtesy : PTI

नाशिक : कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे देश आणि राज्यातील शाळा, महाविद्यालय बंद करण्यात आली आहेत. मात्र, काही ठिकाणी कोरोनाच प्रादुर्भाव कमी होत असल्याने शाळा सुरु करण्याता निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील शाळा (school) चार जानेवारीपासून सुरू होणार आहेत. 

९ वी ते १२  वीचे वर्ग चार जानेवारी पासून सुरू होणार आहेत. तर पहिली ते ८ वीचं शिक्षण ऑनलाईन पध्दतीनेचं सुरू राहणार आहे. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा आढावा बैठकीत ही माहिती दिली. मात्र नाशिक शहरातल्या शाळांबाबत अजून निर्णय घेण्यात आलेला नाही.

कर्नाटक राज्यात शाळा सुरु होणार

दरम्यान, देशातील कर्नाटक (Karnataka) सरकारने शनिवारी प्री-युनिव्हर्सिटी कॉलेज (PUC) आणि शाळांमध्ये दहावीपर्यंतचे वर्ग पुन्हा सुरू (School Reopen) करण्याचा आणि विद्यापीठाचा प्रमुख कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ईयत्ता ६ ते ९ पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळा १ जानेवारीपासून सुरु करण्याचा निर्णय कर्नाटकच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत.

मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा  यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याच्या विचारात घेण्यात आल्या. सुमारे सात महिन्यांच्या अंतरानंतर जानेवारीत शाळा  पुन्हा सुरू होतील. कोविड -१९ करिता कर्नाटकच्या तांत्रिक सल्लागार समितीने त्यांना १ जानेवारीपासून शाळा पुन्हा सुरू करण्याचा सल्ला दिला होता, असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले.