CBI मध्ये नोकरीची संधी, १२ सप्टेंबरपर्यंत करा अर्ज

 १२ सप्टेंबर २०१८ पर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहे.

Updated: Jul 29, 2018, 03:35 PM IST
CBI मध्ये नोकरीची संधी, १२ सप्टेंबरपर्यंत करा अर्ज

मुंबई : सेंट्रल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (CBI) मध्ये इन्स्पेक्टर पदाची भरती सुरू आहे. यासाठी इच्छूक उमेदवार ऑफलाईन किंवा ऑनलाईन अर्ज करू शकतात.  ही भरती कॉंन्ट्रॅक्ट बेसिसवर असणार आहे. रिटायर्ट ऑफिसरदेखील याचा हिस्सा बनू शकतात. सीबीआय हैदराबाद, कोलकाता, मुंबई, पटना आणि शोध पथकाच्यया झोनसाठी ही भरती होत आहे. १२ सप्टेंबर २०१८ पर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहे. सीबीआयने या पदासाठी ४० हजार प्रतिमहा पगार ठरवलाय तर वयोमर्यादा देखील सीबीआयच्या नियमानुसार असणार आहे. सीबीआयच्या   www.cbi.gov.in या वेबसाईटवरही उमेदवार ऑनलाईन अर्ज करु शकतात.

पात्रता 

मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी किंवा त्याच्याशी समकक्ष आणि १० वर्षांचा अनुभव

पदांचे विवरण 

CBI, ACB, नागपुर, अमरावती: ०१
CBI, ACB, जम्मू: ०१
CBI, ACB, चेन्नई:०३
CBI, ACB, हैदराबाद: ०१
CBI, ACB, विशाखापट्टणम: ०३
CBI, ACB, बंगळुरू, धारवाड़: ०३
CBI, ACB, भुवनेश्वर: ०४
CBI, ACB, पुणे:०१
CBI, ACB, गुवाहाटी: ०२
CBI, ACB, पटना: ०३
CBI, ACB, रांची: ०२
CBI, ACB, धनबाद: ०४

पगार 

निवड झालेल्या उमेदवारांना प्रति महिना ४० हजार पगार मिळणार आहे. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close