तनुश्री - नाना प्रकरणार आमिर खानची प्रतिक्रिया

काय म्हणाला आमीर खान? 

तनुश्री - नाना प्रकरणार आमिर खानची प्रतिक्रिया title=

 मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने गुरूवारी पुन्हा एकदा 2008 च्या आठवणी शेअर केल्या. अभिनेता नाना पाटेकर यांनी तनुश्री दत्ता हीची अनेकदा सेटवर छेडछाड केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने लावला आहे. 10 वर्षांनंतर या घटनेचा खुलासा करत तिने नाना पाटेकरांच नाव घेतलं आहे. या नंतर मीडिया आणि सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली. या प्रकरणावर सगळ्यांनीच प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

काय म्हणाला आमीर खान? 

आता या प्रकरणावर बॉलिवूड दिग्गज अभिनेता मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानने प्रतिक्रिया दिली आहे. कोणत्याही प्रकरणाची योग्य आणि पुरेशी माहिती घेतल्याशिवाय त्यावर टिपणी करणं योग्य नाही. मात्र जेव्हा कधी असं घडतं तेव्हा त्याचा जास्त त्रास होतो. आणि जर असं काही घडलं असेल तर त्याची कसून चौकशी केली पाहिजे. 

नाना पाटेकरांनी आरोप नाकारले 

नाना पाटेकर यांनी तनुश्री दत्ताने लावलेले सर्व आरोप नाकारले आहेत. नाना पाटेकरांनी सर्व आरोप फेटाळून जर तिला असं वाटत असेल तर तिने कायद्याने कारवाई करावी. 10 वर्षांनी लावलेल्या आरोपावर नाना म्हणाले की, एक व्यक्तीने अशा पद्धतीने वक्तव्य केल्यावर मी काय बोलणार? लैंगिक अत्याचार म्हणजे काय? एकाचवेळी आमच्यासोबत सेटवर 200 हून अधिक लोकं असायची. त्यामुळे मी देखील कायद्याने काय करता येईल हे बघेन कारण कोणत्याही पद्धतीचा संवाद मला याबाबत करायचा नाही.