बॉलिवूड सहकाऱ्यांवर गंभीर आरोप लावत कालाकाराकडून जीवन संपवण्याचा प्रयत्न

झगमगत्या विश्वातील काळी बाजू...   

Updated: Jun 3, 2022, 04:31 PM IST
बॉलिवूड सहकाऱ्यांवर गंभीर आरोप लावत कालाकाराकडून जीवन संपवण्याचा प्रयत्न title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये आणखी एका कलाकाराच्या आत्महत्येचं प्रकरण समोर आले आहे. मुंबईतील एका 30 वर्षीय अभिनेत्याने अंधेरी येथील राहत्या घरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र नशीब बलवत्तर असल्यामुळे त्याचा जीव वाचला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्युनियर आर्टिस्ट सरफराजने फिनाईल प्यायलं होतं. मात्र, आता त्याची प्रकृती स्थिर असून अभिनेत्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

फिल्म फेडरेशनच्या दोन अधिकाऱ्यांना नोकरी लावण्यासाठी त्रास देणे आणि पैसे घेतल्याच्या आरोपाखाली पीडित अभिनेत्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही अधिकाऱ्यांना जबाब नोंदवण्यास सांगितले आहे.

एका पोलीस अधिकाऱ्याने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, ज्युनियर अभिनेता सरफराजने फिनाईल प्यायलं होतं. मात्र अभिनेत्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचार झाल्यावर लगेच डिस्चार्ज देण्यात आला. सध्या या प्रकरणी अधिक तपासणी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.