Oh my god! Adipurush चित्रपटामुळे चर्चेत आलेला सैफ अली खान इतक्या संपत्तीचा मालक...

या चित्रपटावरून सध्या सगळीकडेच विरोधाचं वातावरण पेटलं आहे त्यामुळे बॉलीवूडही चिंतेत आहे. 

Updated: Oct 6, 2022, 07:59 PM IST
Oh my god! Adipurush चित्रपटामुळे चर्चेत आलेला सैफ अली खान इतक्या संपत्तीचा मालक...  title=

Saif Ali Khan Net Worth: सैफ अली खान सध्या आपल्या आदिपुरूष (Saif Ali Khan in Adipurush) या चित्रपटामुळं चर्चेत आला आहे. रावणाची भुमिका साकारणारा सैफ अली खान सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. नेटकऱ्यांनी रावणाच्याच नाही तर रामभक्त हनूमानाच्या लुकला नापसंती दर्शवली आहे. अशाप्रकारे रामायणातील पात्रांच्या लुकवर अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यानं आदिपुरूष (Adipurush Release) हा चित्रपट प्रदर्शनापुर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. (adipurush actor saif ali khan net worth luxury bunglows cars houses)

आदिपुरूष या चित्रपटात सैफ अली खानसोबतच भगवान रामाच्या भुमिकेत प्रभास (Prabhas in Adipurush) आहे. सीताच्या भुमिकेतून क्रिती सनन (Kriti Sanon) तर रावणाच्या भुमिकेत सैफ अली खान दिसतो आहे. या चित्रपटावरून सध्या सगळीकडेच विरोधाचं वातावरण पेटलं आहे त्यामुळे बॉलीवूडही चिंतेत आहे. 

आणखी वाचा  - 'हर हर महादेव' चित्रपटातील भुमिकेबद्दल अभिनेता सुबोध भावेचा मोठा निर्णय

आदिपुरूष या चित्रपटातील रावणाच्या (Ravana look in Adipurush) लुकवरून सर्वाधिक वादांग माजला आहे. त्याच्या लुकवरून अनेकांनी तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत. आदिपुरूषमुळे चर्चेत आलेला सैफ अली खान सध्या (Saif Ali Khan look in Adipurush) वेगळ्याच एका कारणासाठी चर्चेत आला आहे. आदिपुरूष या चित्रपटासाठी प्रभास आणि सैफ अली खाननं (Saif Ali Khan Fees) कोट्यावधींची फी आकारली असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की अशाच प्रकारे तद्दन भलीमोठी फी आकारणारे हे कलाकार किती कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत ते? 

सध्या यातलं नावं आहे ते सैफ अली खानचं. सैफ अली खानची संपत्ती वाचून कदाचित तुम्हाला धक्का बसेल. समोर आलेल्या माहितीनुसार, सैफ अली खान सुमारे 1 हजार 120 कोटीं रूपयांच्या मालमत्तेचा मालक आहे. सैफ अली खान हा पतौडी कुटुंबातला आहे. हरियाणात असलेल्या या पतौडी पॅलेसची किंमत जवळपास 800 कोटी रूपये आहे. सैफ अली खान मुंबईत राहतो तेव्हा मुंबईतही त्याचे अनेक महागडे फ्लॅट्स आहेत ज्यांची किंमत 4.2 कोटी रूपये आहे. शिवाय अन्य दोन बंगल्यांची किंमत 6 कोटी रूपये आहेत. परदेशातही सैफकडे हॉलिडे होम आहे.  (Saif Ali Khan Expensive Houses)

आणखी वाचा - 'पार्टीत शाहरूख खानच्या तशा वागण्यामुळं आम्हाला रस्त्यावरच...' रितेश देशमुखच्या वक्तव्यावरून एकच खळबळ

फोर्ब्स 2019 च्या यादीनुसार, सैफ अली खानने 2018-19 मध्ये 17.03 कोटी रुपये कमावले. इतर संपत्तीचा विचार केला तर सैफ 282 कोटी रुपयांचा मालक आहे. शिवाय सैफला महागड्या गाड्यांचा देखील शोक आहे. सैफकडे ऑडी, बीएमडब्ल्यू 7, रेंज रोव्हर, मसटँगसोबत अन्य आलिशान गाड्या (Saif Ali Khan Car Collection) देखील आहेत. त्याच्याकडे असलेल्या गाड्यांची किंमत 50 लाख रूपयांपासून 2 कोटीपर्यंत आहे.