'या' सिनेमासाठी ऐश्वर्या रायने लपवली तिची प्रेग्नेंसी!

सौंदर्य, अदा आणि अभिनयाने बॉलिवूडमध्ये ठसा उमटवणारी अभिनेत्री आणि बच्चन बहु ऐश्वर्या राय.

Updated: Jun 20, 2018, 11:21 AM IST
'या' सिनेमासाठी ऐश्वर्या रायने लपवली तिची प्रेग्नेंसी! title=

मुंबई : सौंदर्य, अदा आणि अभिनयाने बॉलिवूडमध्ये ठसा उमटवणारी अभिनेत्री आणि बच्चन बहु ऐश्वर्या राय अनेक लहान-सहान विवादांमुळे चर्चेत असते. बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भंडारकर यांच्यासोबत झालेल्या वादामुळे ती चर्चेत आली होती. खरंतर मधुर भंडारकर यांनी ऐश्वर्यासोबत ड्रीम प्रोजेक्ट साईन केला होता. दोघेही एकत्र काम करणार होते. पण ऐश्वर्याने एक मोठी गोष्ट दिग्दर्शकापासून लपवली होती. ती म्हणजे ती प्रेग्नेंट असल्याचे तिने दिग्दर्शक मधुर भंडारकर यांना सांगितले नव्हते.

हा होता मधुरचा ड्रिम प्रोजेक्ट

हा सिनेमा होता हिरोईन. या सिनेमासाठी ऐश्वर्या राय, मधुर भंडारकरची पहिली पसंती होती. ऐश्वर्याने हा सिनेमा साईन केला पण प्रेग्नेंट असल्याचे सांगितले नाही. पण या गोष्टीचा खुलासा झाल्यानंतर ऐश्वर्याची खूप नाचक्की झाली.

हा सिनेमा बनवण्यासाठी मधुर भंडारकर याने दीड वर्ष रिसर्च केला होता. या ड्रिम प्रोजेक्टसाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली होती. हा लहानसा सिनेमा नव्हता तर अत्यंत महत्वाकांक्षी प्रोजेक्ट होता. यासाठी मधुर यांनी ४० लोकेशन्स फायनल केले होते. अनेक कलाकारांना साईन केले होते. पण जेव्हा मधुरला ऐश्वर्याच्या प्रेग्नेंसीबद्दल कळले, तेव्हा तो अत्यंत नाराज झाला व त्याने ऐश्वर्याला सिनेमातून काढून टाकले.

अलिकडेच मधुर भंडारकरने केला खुलासा

याबद्दल मधुरने सांगितले की, सिनेमात असे काही सीन्स होते ज्याचा कलाकाराच्या डोक्यावर खोलवर प्रभाव होणार होता. सिनेमाचे ८ दिवसाचे शूटिंगही झाले होते. तेव्हा माझी असोसिएट डिरेक्टर एका अभिनेत्रीसोबत रिहर्सल करत होती. तिचा तोल जावून ती पडली. तिला गंभीर दुखापत झाली. आता जेव्हा मी ऐश्वर्याला बघतो तेव्हा मला फार वाईट वाटते. जर तिच्याऐवजी त्यावेळेस ऐश्वर्या पडली असती तर मी स्वतःला कधीही माफ करु शकलो नसतो. त्याचबरोबर सिनेमात अभिनेत्रीला स्मोक करायचे होते. पण प्रेग्नेंट महिलेसाठी ते योग्य नाही. त्यामुळे कदाचित ऐश्वर्याने त्याला नकार दिला असता. 

त्याचबरोबर सिनेमात अशा अनेक गोष्टी होत्या ज्या प्रेग्नेंट महिलेसाठी हानिकारक होत्या. ऐश्वर्याच्या प्रेग्नेंसीची बातमी आम्हाला एका न्यूज चॅनलकडून मिळाली. तेव्हा ती ४ महिन्यांची प्रेग्नेंट होती. 
सिनेमाचे बरेचसे शूटिंग झाले होते. फक्त ६५ दिवसांचे शूटिंग बाकी होते. कॅमेऱ्यासमोर प्रेग्नेंट महिला दाखवता येणार नव्हती. त्यामुळे कॉन्ट्रक्ट रद्द केले आणि त्यामुळे मी डिप्रेशनमध्ये गेलो. ८ दिवस ऑफिसलाही गेलो नाही, असे ही तो म्हणाला.