७ वर्षांनी एकत्र दिसले कॅटरिना कैफ आणि अक्षय कुमार

  'हमको दिवाना कर गए', 'नमस्ते लंडन', 'वेलकम', 'सिंह इज किंग' आणि 'दे दना दन' अशा सुपरहिट सिनेमांनंतर तब्बल सात  वर्षांनंतर कॅटरिना आणि अक्षय कुमार एकत्र दिसले.

Updated: Oct 15, 2017, 04:00 PM IST
७ वर्षांनी एकत्र दिसले कॅटरिना कैफ आणि अक्षय कुमार  title=

मुंबई :  'हमको दिवाना कर गए', 'नमस्ते लंडन', 'वेलकम', 'सिंह इज किंग' आणि 'दे दना दन' अशा सुपरहिट सिनेमांनंतर तब्बल सात  वर्षांनंतर कॅटरिना आणि अक्षय कुमार एकत्र दिसले.

मात्र ही भेट चित्रपटासाठी नसून कुडो टुर्नामेंटसाठी होती.  

मुंबईमध्ये अक्षय कुमार, कॅटरिना कैफ सोबत युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेदेखील हजर होते. 

अक्षय कुमार आणि आदित्य  ठाकरे यांनी यापूर्वी मार्शल आर्टससाठीदेखील एकत्र प्रयत्न केले होते. त्यानंतर आता कुडो टुर्नामेंटसाठी हे तिघंही एकत्र दिसअले. कॅटरिना आणि अक्षयने काही खास फोटो सोशल मीडियामध्ये शेअर करताना त्यांची ही भेट खूपच खास असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. .

 

अक्षय कुमारने 'टॉयलेट - एक प्रेम कथा' हा सुपरहीट सिनेमा दिला आहे. त्यानंतर तो गोल्डच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. तर कॅटरिना आणि सलमान खानदेखील 'टायगर जिंदा है' या चित्रपटामध्ये झळकणार आहे. तर सध्या ती 'ठग्स ऑफ हिंदोस्तान 'च्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे.