खिलाडी कुमारचा भाव वाढला, सर्वात जास्त मानधनाचा मानकरी

खिलाडी कुमार अक्षय आपल्या मानधनामुळे नेहमीच चर्चेत असतो. आतातर अक्षय कुमार याने मानधनाची रक्कम वाढवल्याची 

Updated: Dec 28, 2020, 08:31 PM IST
खिलाडी कुमारचा भाव वाढला, सर्वात जास्त मानधनाचा मानकरी title=

मुंबई : खिलाडी कुमार अक्षय आपल्या मानधनामुळे नेहमीच चर्चेत असतो. आतातर अक्षय कुमार याने मानधनाची रक्कम वाढवल्याची चर्चा आहे. बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारा कलाकार म्हणून अक्षय कुमारकडे पाहिलं जातं. एका वर्षात अक्षयचे ४ ते ५ चित्रपट प्रदर्शित होतात. कोरोना काळातही अक्षयची कमाई जोरदार सुरू आहे. दरम्यान अक्षय कुमारनं त्याची मानधनाची रक्कम वाढवल्याची चर्चा रंगतेय. 

अक्षय कुमारने त्याच्या मानधनाची रक्कम ९९ कोटी रूपयांवरून १०८ कोटी रूपये केली होती. आता अक्षयने २०२२ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या प्रत्येक चित्रपटाच्या मानधनाची रक्कम वाढवत १३५ कोटी रूपये इतकी केली आहे.

अक्षय कुमार याचा 'लक्ष्मी' हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. जवळपास १३० कोटींमध्ये हा सिनेमा विकला गेला.. त्याचा ‘सूर्यवंशी’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट मार्च २०२१ मध्ये प्रदर्शित होणार आहे.