डिजिटल डेब्यूसाठी मुलाकडूनच मिळाली प्रेरणा - अक्षय कुमार

लवकरच अक्षयचा डिजिटल डेब्यू

Updated: Mar 15, 2019, 12:51 PM IST
डिजिटल डेब्यूसाठी मुलाकडूनच मिळाली प्रेरणा - अक्षय कुमार title=

मुंबई : बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी 'केसरी' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तयारीत व्यस्त आहे. याचदरम्यान अक्षयने वेब सीरीजसाठी काम करणार असल्याचंही सांगितलं. वेब सीरीज आणि चित्रपट या दोन्हींचा एक भाग बनल्याने खूश असल्याचं अक्षयने सांगितलं. डिजिटल जगात अक्षयच्या एन्ट्रीची चांगलीच चर्चा आहे. 

वेब सीरीज करण्यासाठी तुला कोणी प्रेरित केलं या प्रश्नाला उत्तर देताना अक्षयने 'आयएएनएस'ला सांगितलं की, या डिजिटल जगात पुढे येण्यासाठी तसेच यादृष्टीने विचार करण्यासाठी माझा मुलगा आरव सर्वात मोठं कारण असल्याचं त्याने म्हटलंय. ही एक अशी जागा आहे की जिथे सर्वाधिक युवा आहेत आणि इथे माझी काहीतरी विलक्षण करण्याची इच्छा आहे. ज्यामुळे मी युवापिढीशी जोडला जाईन. डिजिटल जगातील ही एक अॅक्शन वेबसीरीज असल्याचं अक्षयने म्हटलंय.

चित्रपटांचे महत्त्व डिजिटल जगात आहे का? चित्रपट थिएटरची जादू कधीच मिटवली जाऊ शकत नाही? या प्रश्नाला उत्तर देताना अक्षयने माझ्यातला कलाकार आणि विश्वास हेच सांगतो की थिएटरची जादू कधीच कमी होणार नाही. परंतु डिजिटल जगातही चांगला कंन्टेट आहे आणि त्याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही. जर मी चित्रपट आणि वेबसीरीज या दोघांचा भाग बनू शकतो तर ती माझ्यासाठी आनंदाची गोष्ट असल्याचं अक्षयने म्हटलं आहे.

'केसरी' के बाद अक्षय कुमार का बड़ा धमाका, डिजिटल प्लेटफार्म पर किया डेब्यू

VIDEO : आगीच्या ज्वाळांसोबतच खिलाडी कुमारचा रॅम्प वॉक

अक्षय कुमार सध्या 'केसरी' चित्रपटात व्यस्त असून येत्या 21 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अनुराग सिंह दिग्दर्शित 'केसरी' माझा पहिला वॉर ड्रामा असून या चित्रपटाशी मी भावनात्मकरित्या जोडला असल्याचं अक्षयने सांगितलं आहे.