बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारची धूम, २.० चित्रपटाची ५ दिवसात एवढी कमाई

2.0 सिनेमाची जोरदार कमाई 

Updated: Dec 6, 2018, 09:40 AM IST
बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारची धूम,  २.० चित्रपटाची ५ दिवसात एवढी कमाई title=

मुंबई : अभिनेता अक्षय कुमार आणि रजनीकांत यांचा २.० हा चित्रपट  प्रेक्षकांना भावला आहे. प्रत्येक ठिकाणी २.० या चित्रपटाची चर्चा होत आहे. असं बघायला मिळत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये ब्लॉकबस्टर झाला आहे. अक्षय कुमारच्या दहाव्या चित्रपटाने सुद्धा १०० कोटींची कमाई केली आहे. पाचव्या दिवशी चित्रपटाने हिंदी वर्जनमध्ये १३.७५ कोटीची कमाई केली आहे.

अक्षय कुमारचे १०० कोटी कमाई केलेले चित्रपट : अक्षय कुमार मागल्या १० चित्रपटांनी १०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली, त्यामध्ये असणारे चित्रपट – टॉयलेट एक प्रेम कथा, गोल्ड, पॅडमेन, अक्षयची १०० कोटी कमाई करणारी चित्रपट आहे. गोल्ड हा चित्रपट ऑगस्ट २०१८ ला रिलीज झाला होता. या चित्रपटाने सुध्दा १०० कोटी कमाई केली होती. 

 १)     टॉयलेट एक प्रेम कथा – १३४.२५ कोटी

२)     राऊडी राठौर -         १३३ कोटी

३)     एअरलिफ्ट  -         १२९ कोटी

४)     रस्तम -              १२८ कोटी

५)     जॉली एलएलबी-२ -    ११७ कोटी

६)     हाऊसफुल-२-          ११६  कोटी

७)     हॉलीडे   -            ११३ कोटी

८)     हाऊसफुल-३-           १०९ कोटी    

९)     गोल्ड    -            १०५ कोटी

१०)  २.०   -   १११ कोटी    (पाच दिवसात )  

बाहुबलीनंतर ही दुसरे डब चित्रपट आहेत की,  ज्यानी रिकॉर्ड तोड कमाई केली आहे. बाहुबली 2 ने हिंदी वर्जन मध्ये 511 कोटी कमाई केली. जेव्हा की दुसऱ्या नंबर वर 2.0 आली आहे.