अक्षयचा 'टॉयलेट : एक प्रेम कथा' बॉक्स ऑफिसवर हिट

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांच्या 'टॉयलेट : एक प्रेम कथा' या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर ६ दिवसांत बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केलीये. 

Updated: Aug 17, 2017, 09:18 PM IST
अक्षयचा 'टॉयलेट : एक प्रेम कथा' बॉक्स ऑफिसवर हिट title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांच्या 'टॉयलेट : एक प्रेम कथा' या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर ६ दिवसांत बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केलीये. 

देशात या सिनेमाने आतापर्यंत ८९.९५ कोटींची कमाई केलीये. या सिनेमाने एकूण १२९.५२ कोटी रुपये कमावलेत. बॉक्स ऑफिस वेबसाईट koimoiच्या माहितीनुसार, या सिनेमाने चार दिवसांत परदेशांत १४.५९ कोटींची कमाई केलीये. 

पहिल्या दिवशी या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर सुरुवात संथ झाली होती. मात्र त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमाईचा वेग पकडला तो अद्याप कायम आहे.