...म्हणून अमिताभ आणि दिग्दर्शकामध्ये झाला वाद !

सध्या बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 3, 2017, 04:38 PM IST
...म्हणून अमिताभ आणि दिग्दर्शकामध्ये झाला वाद ! title=

नवी दिल्ली : सध्या बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. या चित्रपटात पहिल्यांदाच बिग बी आणि परफेशनिस्ट आमिर खान एकत्र दिसणार आहेत. मात्र या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दिग्दर्शक विजय कृष्णा आचार्या आणि अमिताभ बच्चन यांच्यात एक सीन शूट करताना बाचाबाची झाली. त्यानंतर हा वाद मिटवण्यासाठी आमिरला मध्यस्थी करावी लागली. 

दोघांमध्ये झालेल्या या वादामुळे सुमारे तीन तास शूटींग बंद होते. खरंतर अमिताभ यांना चित्रपटातील कोणतातरी सीन आवडला नव्हता. त्यामुळे दिग्दर्शक विजय यांच्या सोबत त्यांचे वादविवाद सुरु होते. मात्र त्याचे इतके गंभीर स्वरूप झाले की, ३ तास शूटींग बंद करावे लागले. 
चित्रपटाची कथा सुरेख असून काही दिवसांपूर्वीच आमिर आणि अमिताभचा चित्रपटातील लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.