'Amitabh Bachchan चं एवढी हिम्मत दाखवू शकतात', बिग बींनी जया बच्चन यांचा बनवला 'त्या' क्षणाचा Video

Amitabh Bachchan Video : जया बच्चन या खूप रागीट स्वभावाच्या असून त्यांना कोणी त्यांचे व्हिडीओ काढलेले आवडतं नाही. पण बिग बी यांनी जया बच्चन यांचा एक व्हिडीओ काढला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.   

नेहा चौधरी | Updated: Sep 7, 2023, 01:50 PM IST
'Amitabh Bachchan चं एवढी हिम्मत दाखवू शकतात', बिग बींनी जया बच्चन यांचा बनवला 'त्या' क्षणाचा Video  title=
amitabh bachchan jaya bachchan Funny Video get viral on Internet

Amitabh Bachchan Video : बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन वयाच्या 80 व्या वर्षीही आपल्या अभिनयाने लाखो हृदयावर राज्य करत आहे. ते चित्रपटासोबतच सोशल मीडियावरहून चाहत्यांचे मनोरंजन करत असतात. ते कायम त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. पण त्याच्या अगदी उलटी वृत्ती ही जया बच्चन यांची आहे. त्यांना कधीही त्यांचे फोटो व्हिडीओ काढलेले आवडतं नाही. त्या सोशल मीडियावरही सक्रीय नाहीत. (Amitabh Bachchan Jaya Bachchan Viral Video)
 
जया बच्चन यांच्या रागाचा सामना कायम पापाराझींना करावा लागतो. सोशल मीडियावर पापाराझींवर भडकतानाचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. एवढंच नाही तर एका शोमध्ये अभिषेक बच्चननेही आई जया बच्चन यांच्या रागाचं कारण सांगितलं. तो म्हणाला होता की, जया बच्चन यांना व्हिडीओ आणि फोटो काढलेले आवडत नाही. पण जया बच्चन यांचा एक व्हिडीओ खुद्द अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. (amitabh bachchan jaya bachchan Funny Video get viral on Internet)

'Amitabh Bachchan चं एवढी हिम्मत दाखवू शकतात'

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर जया बच्चन यांच्यासोबतचा एक सेल्फी व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ एखाद्या कार्यक्रमाच्या सेटवरचा दिसत आहे. पहिल्यांदा मोबाईलचा कॅमेऱ्यात बिग बी दिसतात त्यानंतर बाजूला बसलेल्या जया बच्चन यांच्याकडे ते कॅमेरा वळवतात. पण पहिल्यांदाच जया बच्चन व्हिडीओ सुरु असतानाच हसताना दिसल्या आहेत. 

हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी भरभरून कंमेट्स केल्या आहेत. 'Amitabh Bachchan चं एवढी हिम्मत दाखवू शकतात', असं एका यूजर्सने लिहिलं आहे. तर दुसरा यूजर्स म्हणाला की, आता घरी जाऊन बिग बींचं काही खैर नाही.