पुन्हा एकदा बेबी बंप लपवताना दिसली अनुष्का, दिवाळी पार्टीमधील 'तो' VIDEO VIRAL

Anushka Sharma And Virat Kohli : वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाची स्टार खेळाडू विराट कोहली एकामागोमाग रेकार्ड मोडतोय. खासगी आयुष्यात विराट कोहलीच्या घरात आनंदाची बातमी आहे. पुन्हा एकदा बेबी बंप लपवताना अनुष्का स्पॉट झाली आहे. 

नेहा चौधरी | Updated: Nov 12, 2023, 01:54 PM IST
पुन्हा एकदा बेबी बंप लपवताना दिसली अनुष्का, दिवाळी पार्टीमधील 'तो' VIDEO VIRAL title=
Anushka once again seen hiding her baby bump after her pregnancy was confirmed Virushkas Diwali party VIDEO VIRAL

Anushka And Virat Diwali Video : बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आज दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर भारत आणि नेदरलँड्सची टक्कर होणार आहे. वनडे वर्ल्डकप  (World Cup 2023) स्पर्धेतील भारत आणि नेदरलँड्साकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाने शनिवारी रात्री बंगळुरूमध्ये दिवाळी पार्टी केली. या पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.  (Anushka once again seen hiding her baby bump after her pregnancy was confirmed Virushkas Diwali party VIDEO VIRAL)

त्यात काही दिवसांपूर्वी अनुष्का आणि विराट मॅटर्निटी हॉस्पिटलबाहेर स्पॉट (Anushka Sharma Pregnant Video) झाले होते. त्यानंतर त्यांच्याकडे गूड न्यूज आहे का अशी चर्चा रंगली होती. पण विरुष्काने याबद्दल काही भाष्य केलं नव्हतं. त्यानंतर विराट आणि अनुष्का पु्न्हा एकदा आई बाबा होणार आहे या गोष्टीला शिक्कामोर्तब करणारा एक व्हिडीओ नुकताच समोर आला होता. विरुष्काच्या घरी गोड न्यूज आहे असंच चर्चा पुन्हा रंगली आहे. या व्हिडीओमध्ये काळा रंगाच्या शॉर्ट वनपीसमध्ये अनुष्काचा बेबी बंप दिसत होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आता पुन्हा एकदा बंगळुरूमधील त्यांच्या हॉटेलमध्ये दिवाळी सेलिब्रेटमधील एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये विराट कोहलीसोबत अनुष्का ट्रेडिशनल आऊफिटमध्ये दिसत आहेत. अनुष्काने पिंक कलरच्या ड्रेस घातलेला आहे. त्या वेळी पापाराझींच्या कॅमेऱ्यासमोर अनुष्का ओढणीनं बेबी बंप लपवतांना दिसत होती. त्यामुळे त्यांच्या घरी गूड न्यूज आहे हे बऱ्यापैकी कर्न्फम झालं आहे. 

या व्हिडीओला नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजर्सने कमेंट केली आहे की, मला वाटतं की, 2023 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सगळ्यांना गूड न्यूज देणार आहे. तर एका यूजर्सने सांगितलं की, अनुष्का बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.