Viral Video: पहिल्यांदा ऑडिशन दिलं तेव्हा इतकी क्यूट दिसायची अनुष्का शर्मा

अनुष्का शर्माने 2008 मध्ये आलेल्या आदित्य चोप्रा दिग्दर्शित रब ने बना दी जोड़ी सिनेमातून पदार्पण केलं आहे. ज्यामध्ये तिने शाहरुख खानसोबत स्क्रिन शेअर केली होती. यानंतर तिने पीके, बँड बाजा बारात, सुल्तान आणि ऐ दिल है मुश्किलसारखे मोठ मोठे हिट सिनेमात काम केलं आहे.

Updated: Dec 27, 2023, 06:55 PM IST
Viral Video: पहिल्यांदा ऑडिशन दिलं तेव्हा इतकी क्यूट दिसायची अनुष्का शर्मा title=

मुंबई  : अनुष्का शर्माने 2008 मध्ये आलेल्या आदित्य चोप्रा दिग्दर्शित रब ने बना दी जोड़ी सिनेमातून पदार्पण केलं आहे. ज्यामध्ये तिने शाहरुख खानसोबत स्क्रिन शेअर केली होती. यानंतर तिने पीके, बँड बाजा बारात, सुल्तान आणि ऐ दिल है मुश्किलसारखे मोठ मोठे हिट सिनेमात काम केलं आहे. मात्र अनुष्का टॉपची एक्ट्रेस बनण्याआधी ती एक मॉडेल होती. मात्र सध्या अनुष्काचा असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

अनुष्का शर्माचा समोर आलेला व्हिडीओ हा तिच्या पहिल्या ऑडिशनचा आहे. हा व्हिडीओ एका कास्टिंग एजन्सीने पोस्टद्वारे शेअर केला आहे. नंतर हा व्हिडीओ इतका व्हायरल होवू लागला की, तिच्या प्रत्येक चाहत्याने सोशल मीडियावर तिचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. अनुष्का शर्माचा व्हायरल होत असलेला हा  व्हिडिओ 18 वर्ष जूना आहे.  या व्हिडीओ क्लिपच्या शेवटी यापूर्वी काम केलेल्या ब्रँडचा उल्लेख केला आहे.

2017 मध्ये अनुष्का शर्माने  इटलीमध्ये एका इंटिमेट सेरेमनीम ध्ये क्रिकेटर विराट कोहलीसोबत लग्न केलं. यानंतर  २०२१ मध्ये अनुष्काने एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिच्या मुलीचं नाव वामिका आहे. विराट आणि अनुष्काची पहिली भेट एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान झाली. या महिन्याच्या सुरुवातीला अनुष्का आणि विराटने लंडनमध्ये त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशनचे फोटो अवघ्या काही वेळातच व्हायरल होवू लागले. हे फोटो शेअर करत अनुष्काने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहीलं की, "प्रेम आणि मित्र आणि कुटुंबाने भरलेला दिवस. ग्रामसाठी पोस्ट करायला उशीर झाला? 6+अनंतता" माझा नंबर एकसोबत प्रेम.''

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेत्री पुढे स्पोर्ट्स बायोपिक चकडा एक्सप्रेसमध्ये दिसणार आहे,  वामिकाच्या जन्मानंतर हा तिचा पहिला प्रोजेक्ट असेल. हा चित्रपट क्रिकेटर झुलन गोस्वामी हिच्या जीवनावर आधारित आहे.  या अभिनेत्रीने गेल्या वर्षी तिचा भाऊ कर्णेश शर्मा निर्मित नेटफ्लिक्स चित्रपट कालामध्येही छोटी भूमिका साकारली होती.