सचिन तेंडुलकरचा 'तो' व्हिडीओ पाहून 'बाईपण भारी देवा'मधील अभिनेत्रीची कमेंट, म्हणाली 'तुम्ही...'

सचिन तेंडुलकर काश्मीरच्या गुलाबी थंडीत क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. त्याच्या या व्हिडीओवर एका मराठी अभिनेत्रीने कमेंट केली आहे. 

Updated: Feb 22, 2024, 04:20 PM IST
सचिन तेंडुलकरचा 'तो' व्हिडीओ पाहून 'बाईपण भारी देवा'मधील अभिनेत्रीची कमेंट, म्हणाली 'तुम्ही...' title=

Sachin Tendulkar Playing Cricket In Kashmir : भारताचा महान फलंदाज आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर हा सतत काही ना काही कारणांनी चर्चेत असतो. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर नुकतंच काश्मीरच्या गुलाबी थंडीत क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. याचा एक व्हिडीओही त्याने शेअर केला आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्याच्या या व्हिडीओवर एका मराठी अभिनेत्रीने कमेंट केली आहे. 

काश्मीरच्या रस्त्यावर सचिनने घेतला क्रिकेटचा आनंद

सचिन तेंडुलकर हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. सचिन हा सध्या त्याच्या कुटुंबासोबत काश्मीरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. आता सचिनने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सचिन हा काश्मीरच्या रस्त्यावर क्रिकेट खेळताना दिसत आहे. यात सचिन हा हातात उलटी बॅट पकडूनही बॅटिंग करताना दिसत आहेत. 

स्वर्गात क्रिकेटचा सामना, कॅप्शन चर्चेत

यानंतर सचिनने उपस्थित असलेल्या चाहत्यांसोबत सेल्फीही घेतले. त्याने या व्हिडीओला हटके कॅप्शनही दिले आहे. "क्रिकेट आणि काश्मीर: स्वर्गात क्रिकेटचा सामना", असे कॅप्शन सचिननने दिले आहे. यावेळी सचिनच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत आहे. सचिनच्या या व्हिडीओवर मराठी अभिनेत्री सुकन्या मोने यांनीही कमेंट केली आहे. 

सुकन्या मोने काय म्हणाल्या?

"सचिन तेंडुलकर तुम्ही फार कमाल आहात", अशी कमेंट सुकन्या मोने यांनी केली आहे. त्यांची ही कमेंट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सचिनच्या या व्हिडीओवर इतर अनेक चाहतेही कमेंट करताना दिसत आहेत. अनेकांनी यावर "शेवटचा चेंडू" अशी कमेंट केली आहे. तर काहींनी यावर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे. 

Sukanya Mone commented

दरम्यान सुकन्या मोने या 'बाईपण भारी देवा' या चित्रपटामुळे चर्चेत आला. केदार शिंदे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. सहा बहिणींच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या चित्रपटाला महिला वर्गानं अक्षरशः डोक्यावर घेतलं. या चित्रपटातील प्रत्येकाची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. यात सुकन्या मोने यांनी साधना काकडे हे पात्र साकारले होते.