'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीचे जबरदस्त Transformation, ईदच्या निमित्ताने शेअर केला खास व्हिडीओ

'बजरंगी भाईजान' सोबतच हर्षालीने 'कबूल है', ''लौट आओ त्रिशा', 'जोधा अकबर' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच अनेक जाहिरातीतही ती झळकली.  

Updated: Apr 11, 2024, 03:06 PM IST
'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीचे जबरदस्त Transformation, ईदच्या निमित्ताने शेअर केला खास व्हिडीओ title=

Bajrangi Bhaijaan Munni Eid Wishes : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा बजरंगी भाईजान हा चित्रपट सुपरहिट ठरला. 2015 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटात सलमान खान, करीना कपूर, नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यासोबतच छोट्याशा मुन्नीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. बजरंगी भाईजान या चित्रपटात मुन्नी हे पात्र हर्षाली मल्होत्राने साकारले होते. यात तिने एका पाकिस्तानी मुलीची भूमिका साकारली होती. यात जन्मापासून तिला बोलता येत नाही, असे दाखवण्यात आले होते. आता पुन्हा एकदा हर्षाली मल्होत्रा ही चर्चेत आली आहे. 

चाहत्यांना दिल्या ईदच्या शुभेच्छा 

बजरंगी भाईजान या चित्रपटात अभिनेत्री हर्षाली मल्होत्राने सर्वांचीच मनं जिंकली होती. तिच्या अभिनयाने आणि गोंडस चेहऱ्याने प्रेक्षकांच्या मनात एक अनोखे स्थान निर्माण केले होते. हर्षाली ही सोशल मीडियावर सक्रीय असते. ती कायमच फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. आता हर्षालीने ईदच्या मुहुर्तावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे तिने चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

यात हर्षालीने काळ्या रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला आहे. त्यासोबत तिने पारंपारिक दागिनेही परिधान केले आहेत. यात ती 'चांद नजर आया' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यात ती सलाम करत शुभेच्छा देताना पाहायला मिळत आहे. यात हर्षालीने ईद-उल-फितरच्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. हर्षालीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओवर तिचे अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत. यात काहींनी 'ईद मुबारक', 'चाँद नजर आ गया' अशा कमेंट केल्या आहेत. तसेच अनेकजण कमेंट करत तिला ईदच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. 

चित्रपटाला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

दरम्यान 'बजरंगी भाईजान' या चित्रपटामुळे हर्षालीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. यामुळे ती एका रात्रीत सुपरस्टार बनली. या चित्रपटासाठी कबीर खान यांनी तब्बल 5 हजार लहान मुलींचे ऑडिशन घेतले होते. यातून हर्षाली मल्होत्राची निवड करण्यात आली होती. यात हर्षालीने पाकिस्तानी मुलीची भूमिका साकारली होती. यात ती बोलू शकत नाही, असे पात्र साकारत होती. या चित्रपटातील मुन्नीच्या भूमिकेमुळे 'बजरंगी भाईजान' या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 'बजरंगी भाईजान' सोबतच हर्षालीने 'कबूल है', ''लौट आओ त्रिशा', 'जोधा अकबर' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच अनेक जाहिरातीतही ती झळकली.