'मला काही बोलण्यापूर्वी तुमच्या पोराच्या ‘मिर्झापूर’वर बोला!' संदीप रेड्डी वांगाने जावेद अख्तर यांना सुनावलं!

एनिमल हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. हा सिनेमा 2023 मधील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपटापैकी एक ठरला. अनेकांनी या सिनेमाला पसंती दिली तर अनेकांनी मात्र या सिनेमावर टीका केली.

Updated: Feb 7, 2024, 01:14 PM IST
'मला काही बोलण्यापूर्वी तुमच्या पोराच्या ‘मिर्झापूर’वर बोला!' संदीप रेड्डी वांगाने जावेद अख्तर यांना सुनावलं! title=

मुंबई : संदीप रेड्डी वांगा यांच्या ॲनिमलला  पोलराइझिंग रिव्हूव मिळाले. संदीप यांच्या सिनेमावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं मात्र या सिनेमावर अनेकांनी टिकाही केली. मात्र जितके संदिप रेड्डी त्यांच्या प्रेक्षकांकडून कौतूक ऐकून भावूक होतात. तितकीच त्यांना टीकाही सहन होत नाही. नुकतीच जावेद अख्तर यांनी अॅनिमलवर टीका केली. त्यांची टीका ऐकताच  संदीप रेड्डी यांनी फरहान अख्तरच्या फरहान अख्तरच्या सिनेमा 'मिर्झापूर'ला बकवास म्हटत ट्रोल केलं आहे. इतकंच नाहीतर मिर्झापूर पाहिल्यानंतर मला एन्झाइटी होते असंही तो म्हणाला आहे. चला तर मग जाणून घेवूया काय आहे हे नेमकं प्रकरण

नुकतेच जावेद अख्तर यांनी रणबीर कपूर स्टारर एनिमलवर भाष्य केलं होतं. यावेळी एनिमल विषयी बोलताना ते म्हणाले की, हा सिनेमा हिट होणं खूपच खतरनाक गोष्ट आहे. जावेद अख्तर यांना अजंता-एलोरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये वक्ता म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. यादरम्यान त्यांनी आजच्या सिनेमातील हिरोंवर वक्तव्य करत म्हटलं की, मी समजू शकतो की, यंग फिल्ममेकर्ससाठी ही एक मोठी परीक्षा आहे की, कशाप्रकारे आज तुम्ही कोणतं पात्र साकाराल आणि कोणतं पात्र समाजाला आवडेल हे काही सांगता येत नाही. ज्या सिनेमात एखादा पुरुष स्त्रीला चल माझे चप्पल चाट असं सांगतो, जर एखाद्या पुरुषाने स्त्रीला थप्पड मारण्यात चुकीचं काय असं बोलल्यावर तो सिनेमा सुपर-डुपर हिट ठरतो ही एक खतरनाक गोष्ट आहे.''

जावेद यांचं हे वक्तव्य ऐकल्यावर संदीप वांगा खूपच चिडला आणि त्यांच्या वक्तव्याला उत्तर दिलं आहे. याविषयी बोलताना संदीप म्हणाला, ''जावोद अख्तर यांनी वक्तव्य केल्यानंतर हे स्पष्ट होतं की, त्यांनी हा सिनेमा नक्कीच पाहिला नाही. आता कोणी सिनेमा न पाहता त्यावर कमेंट करेल तर त्यावर मी तरी काय बोलणार. मला खूप वाईट वाटतंय. कारण लोकं दुसऱ्यांना ट्रोल करताना स्वत:कडे कधीच पाहत नाहीत.''

मिर्झापूर केल्यानंतर जावेद साहेबांनी फरहान अख्तरला काहीच का म्हटलं नाही? 'मिर्झापूर'मध्ये दुनियाभरच्या शिवीगाळ दाखवली गेली आहे. मी हा सिनेमा संपुर्ण पाहिलेला नाही. हा सिनेमा मी तेलुगूमध्ये ट्रान्सलेट केल्यानंतर मी पाहिला यानंतर मला उल्टी आली. जावेद साहेब आपल्या मुलाचं काम का पाहत नाहीत? असं वक्तव्य संदीप रेड्डी वांगा यांनी केलं आहे. त्यामुळे आता हा वाद चांगलाच पेटणार असल्याचं दिसत त्यामुळे या संपुर्ण प्रकरणात पुढे नेमकं काय होतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 2023 मधील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपटापैकी  'ॲनिमल हा एक ठरला. 900 कोटींहून अधिक कमाई  'ॲनिमल' या सिनेमाने केली आहे.