Bigg Boss : पुन्हा एकदा जसलीनचा बिकीनी अवतार

काय आहे हा अजब प्रकार 

Bigg Boss : पुन्हा एकदा जसलीनचा बिकीनी अवतार  title=

मुंबई : बिग बॉस सिझन 12 मध्ये अनूप जलोटा आणि त्यांची गर्लफ्रेंड जसलीन मथारूने एक वेगळाच रंग भरला. अनूप जलोटा सध्या बिग बॉसच्या सिक्रेट रूममध्ये असून तिथून ते जसलीनवर लक्ष ठेवून आहेत. तर दुसरीकडे अगदी बेफिकीर होत जसलीन मथारून पूलमध्ये मस्ती करत आहे. तिला पाहताच तेथे उपस्थित असलेला स्पर्धक रोमिल देखील पूलमध्ये उतरला. 

झालं असं की, पूलमध्ये दीपक ठाकूर आणि रोमिल चौधरी मस्ती करताना दिसत होते. तेव्हाच बिकीनी घालून जसलीन पूलमध्ये आली. तिला पाहताच रोमिल देखील धावत गेला. पण पूलबाहेर बसलेले घरातील मंडळी जबरदस्ती त्याला पूलमध्ये ठकलतात. तेव्हा जसलीन म्हणते की, जेव्हा पण मी पूलमध्ये येते लोकं पळून जातात.  

यानंतर रोमिल चौधरी म्हणतो की, माझा घटस्फोट झाला आहे. आपण बघू शकतो दिवसेंदिवस बिग बॉस 12 मध्ये घरात अधिकाधिक रोमांच वाढत चालला आहे. या अगोदर जसलीन लाल रंगाच्या बिकीनी घालून पूलमध्ये उतरली होती.