Blackbuck Poaching Case : राणी मुखर्जीने दिली ही प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी ही सलमान खानसोबत 'हॅलो ब्रदर्स' या सिनेमात दिसली. राणी मुखर्जीच कायमच सलमान खानसोबत उभी राहिली आहे. काळवीट शिकार प्रकरणात तब्बल 20 वर्षानंतर सलमान खानला 5 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. 

Dakshata Thasale Updated: Apr 6, 2018, 09:13 AM IST
Blackbuck Poaching Case : राणी मुखर्जीने दिली ही प्रतिक्रिया  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी ही सलमान खानसोबत 'हॅलो ब्रदर्स' या सिनेमात दिसली. राणी मुखर्जीच कायमच सलमान खानसोबत उभी राहिली आहे. काळवीट शिकार प्रकरणात तब्बल 20 वर्षानंतर सलमान खानला 5 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. 

सलमान खानने कालची रात्र दिवस जोधपुर मध्यवर्ती कारागृहात घालवला आहे. सलमान खानला झालेली शिक्षा ही चाहत्यांप्रमाणेच कलाकारांना देखील धक्कादायक आहे. मात्र बिष्णोई समाजाने सलमानला शिक्षा सुनावल्यानंतर चक्क जल्लोष केला. यावर राणी मुखर्जीने प्रतिक्रिया दिला आहे. राणी मुखर्जी म्हणते की, राणी मुखर्जीने मीडियाशी बोलताना सांगितलं आहे की, मी कायम बोलत आली आहे माझं प्रेम सलमान खानसोबत कायम राहिलं. 

ही व्यक्ती ढसाढसा रडली 

बुधवारी सलमानच्या दोन्ही बहिणी त्याच्यासोबत जोधपूरला चार्टर प्लेनने आल्या आहे. सलमानसोबतच त्या हॉटेलमध्ये थांबल्या आहेत. सलमान ज्यावेळी कोर्टात आला त्यावेळी त्याच्यासोबत या दोघीही हजर होत्या. सलमानला ज्याक्षणी शिक्षा सुनावली त्यावेळी अलविराच्या भावनांचा बांध तुटला आणि ती ढसढसा रडू लागली. कोर्टरुममध्ये त्याच्या खुर्चीजवळ अर्पिता आणि अलविरा या दोन्ही बहिणी उभ्या होत्या. न्यायाधीशांनी शिक्षा सुनावताच सलमान मान खाली घालून खुर्चीवर बसला. तो अतिशय दु:खी दिसत होता. सलमानला आजची रात्र तुरुंगातच काढावी लागणार आहे. कारण त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी करण्यास जिल्हा सत्र न्यायालयाने नकार दिला आहे