Drugs Case: भारती- हर्षला मोठा दिलासा; पण...

या दोघांच्याही अडचणीत वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं

Updated: Nov 23, 2020, 04:16 PM IST
Drugs Case: भारती- हर्षला मोठा दिलासा; पण...  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : कॉमेडीयन भारती सिंग (Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिम्बाचिया (Haarsh Limbachiyaa) यांना रविवारी न्यायालयानं 4 डिसेंबरपर्यंतची कोठडी सुनावली. ज्यानंतर या दोघांच्याही अडचणीत वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं.

नारकोटीक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) ने अटक केल्यानंतर रविवारी त्यांना मुंबईतील (Kila Court पुढं हजर करण्यात आलं होतं. पण, न्यायालयीन कोठडीचा निर्णय सुनावताच हर्ष आणि भारतीनं जामीन अर्ज दाखल केला होता. ज्यावर सोमवारी सुनावणी करण्यात आली.

एनसीबीकडून करण्यात आलेल्या कारवाईनंतर अटकेत असणाऱ्या हर्ष आणि भारतीला मोठा दिलासा देत न्यायदंडाधिकारी कोर्टानं त्यांचा जामीन मंजूर केला. प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांचा जामीन मंजून झाला. जामीन प्रक्रियेत तितक्याच रकमेच्या हमीदाराचाही समावेश आहे. शिवाय यापुढं एनसीबीला तपासात सहकार्य करण्याचं आणि पुराव्यांशी कोणत्याची प्रकारची छेडछाड न करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. 

दरम्यान, ड्रग्ज पेडलर्सकडून मिळालेल्या माहितीनंतर कॉमेडियनच्या भारती सिंगच्या घरी एनसीबीने धाड टाकली होती. एनसीबीनं केलेल्या या कारवाईत त्यांचा घरात आणि कार्यालयात ८६.५ ग्रॉम ड्रग्स जप्त करण्यात आले. शिवाय गांजाचे सेवन करत असल्याची कबुली दोघांनी दिली होती. 

 

अभिनेता सुशांत सिंह राजपूत sushant singh rajput आत्महत्या प्रकरणीचा तपास करत असताना त्याला जोडूनच एनसीबीनं सूत्र हलवत कलाविश्वातील ड्रग्जचं एक मोठं जाळ समोर आणलं. याअंतर्गत अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, त्यामागोमाग  निर्माता फिरोझ नाडियादवालाची पत्नी शबाना, अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची प्रेयसी अशा सेलिब्रिटींपुढं अडचणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यातच आता भारती आणि हर्षचंही नाव पुढं आलं.