स्विझर्लंडहून आलेल्या कोरोनाग्रस्त महिलेमुळे मराठी कलाकारांचा हा परिसर सील

मुंबईत मराठी कलाकारांची कॉलनी ​बिंबीसारनगरमध्ये स्विझर्लंडहून आलेल्या कोरोनाग्रस्त महिलेची भटकंती.

Updated: Mar 31, 2020, 10:50 AM IST
स्विझर्लंडहून आलेल्या कोरोनाग्रस्त महिलेमुळे मराठी कलाकारांचा हा परिसर सील title=

मुंबई :  मुंबईत मराठी कलाकारांची कॉलनी बिंबीसारनगरमध्ये स्विझर्लंडहून आलेल्या कोरोनाग्रस्त महिलेची भटकंती सुरु असल्याचे निदर्शानास आले आहे. मराठी कलाकारांची सोसायटी पोलिसांकडून सील करण्यात आली आहे. महिलेच्या संपर्कात आलेल्यांना करणार क्वारंटाईन करण्यात येणार आहे.

महिलेने कोरोनाची माहिती लपवली

मुंबईत मराठी कलाकारांची कॉलनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या बिंबीसारनगरमध्ये एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी ही महिला स्विझर्लंडहून मुंबईत परतली. तिला त्रास जाणवू लागल्याने तिने रुग्णालयात धाव घेतली तेव्हा तिला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाले. मात्र तत्पूर्वी या महिलेने ही बाब सोसायटीतील नागरिकांपासून लपवून ठेवली होती. 

सोसायटीत तणावाचे वातावरण

परिसरात अनेकांना ती भेटली असल्याने आता बिंबीसारनगरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झालंय. बिंबीसारनगर सोसायटीला आता पोलिसांनी सील केलंय. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.